अखेर आरमोरी रामाळा महामार्गावरील आंब्याचे झाड नगर परिषदने हटविले

सुपर फास्ट बातमीची घेतली दखल
आरमोरी:- वैरागड-आरमोरी मार्गावर गाढवी नदीकाठावर रस्त्याच्या मधोमध आंब्याचे मोठे झाड पडले होते. चार दिवस होऊनही त्या झाडाची विल्हेवाट लावली नव्हती. याबाबत काल ९ मार्च रोजी सुपर फास्ट बातमी मध्ये वृत्त प्रकाशित करून प्रशासनाने लक्ष वेधले होते. या वृत्ताची दखल घेत नगरपरिषद आरमोरीने हे झाड शनिवारी हटविले आहे.

वैरागड आरमोरी बायपास रामाळा मार्गावर गाढवी नदीच्या काठी आंब्याचे झाड पडले होते. त्यामुळे वाहन चालक स्मशानभूमीच्या बाजूने असलेल्या रस्त्याने जात होते. हा रस्ता फारच अडचणीचा असल्याने चारचाकी वाहन काढणे कसरतीचे होते.प्रशासनाचे याकडे लक्ष नव्हते. शेवटी सुपर फास्ट बातमी मधून ही समस्या मांडताच त्याच दिवशी ९ मार्चला मजुरांकरवी झाड हटविण्यात आले. या झाडामुळे विद्युत तारा व खांब देखील तुटले आहे. वैरागड आरमोरी मार्गावरील वाहतूक सुरळीत झाल्याने नागरिकांनी सुपर फास्ट बातमीचे आभार मानले आहे.
काल लागलेली बातमी

Post a Comment

Previous Post Next Post