भाऊजीने केला अल्पवयीन साळीवर बलात्कार

कारंजा :- ठाण्यांतर्गत माळेगाव शेतशिवारात भाऊजीने अल्पवयीन साळीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी तळेगांव पोलिस ठाण्यात पास्कोअंतर्गत गुन्हा दाखल केला असून, नराधम आरोपीला अटक करण्यात आली आहे.

कारंजा तालुक्यातील एकार्जुन येथील आरोपी धनपाला नंदाराम डोंगरे (वय 36) याने अल्पवयीन
चुलतसाळीला लग्न समारंभच्याकार्यक्रमाला तीन-चार दिवसांकरिता गावाला घेऊन जात असल्याचे पीडितेच्या आईला सांगितले. या बहाण्याने पीडितेला दुचाकीवर बसून घेऊन गेला. नराधम आरोपी गावाला न जातां माळेगाव शेतशिवारात
अल्पवयीन मुलीला घेऊन गेला. त्याठिकाणी तिच्यावर जबरदस्ती करण्यात आली.
अल्पवयीन साळीने नकार दिल्यानंतरआरोपीने तिचे डोक्याचे केस ओढून बळजबरीने तिच्यावर अत्याचार केला.

याप्रकरणी तळेगांव पोलिसांनी पीडितेच्या फिर्यादीवरून पास्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी धनपाल नंदाराम डोंगरे याला ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास पास्को सेलच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक वंदना सोनुने करीत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post