विजे अभावी शेतकऱ्यांचे धान मनावस्थेत कृषी पंपासाठी भारनियमनातील आठ तास विज पुरवठा सुरळीत करा अन्यथा चकाजाम आंदोलन गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम.माक्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अमोल मारकवार प्रहार जनशक्ती पक्षाचे निखिल धार्मिक यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी यांना निवेदनातून इशारा

आरमोरी- तालुक्यातील  शेतकऱ्यांनी आपल्या कृटुबाचा गाडा चालविण्यासाठी पावसाळी उत्पनात घट आल्याने उन्हाळी धान पेरणी कृषी पंपाच्या सहाय्याने करुण  रोवणीही पुण केली असता काही दिवसातच  शासनाने शेतकऱ्यांना कोणतीही पुव सुचना न देता सरसकट कृषी पंपासाठी भारनियमन सुरू करुन कृषी पंपासाठी आठच तास विज देणे सुरू  केले यातही कित्येक शेतकऱ्यांना पाण्या अभावी बरेचसे धान पिक पाण्याअभावी वारले परतु वाचलेले धान पिक आठ तासांच्या भारनियमनात कसे बसे जगवताना काल रात्रो दोन च्या सुमारास पासुन भारनियमातील आठ तासातुन तिनच तास कृषी पंपाना देणे सुरू असल्यामुळे आता दिड महिन्यात च्या कालावधीत हातात आलेले उन्हाळी धान पिक मनावस्थेत आल्याने चामोशी वनखी ठानेगाव डोंगरगाव वासाळा परीसरातील  शेतकऱ्यांनी गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अमोल मारकवार प्रहारचे निखील धार्मिक यांच्या नेतृत्वात उपविभागीय अभियंता  विज वितरण कम्पनी च्या कार्यालयाला धडक देऊन उपविभागीय अभियंता बोबडे यांना जाब विचारला असता वरीष्ठाच्या आदेशानुसार कृषी पंपासाठी भारनियमनातील सुरू असलेला आठ तास पुरवठा कमि करुन तिन तास करण्यात आले यात मि काहीच करु शकत नाही वरीष्ठाच्या आदेशाचे पालन करणे आम्हचा कत्यव्य असल्याचे सांगितल्याने  विज वितरण कम्पनीच्या विरोधात रोष व्यक्त करुण विजे अभावी शेतकऱ्यांचे धान मनावस्थेत असल्याने कृषी पंपासाठी भारनियमनातील आठ तास विज पुरवठा सुरळीत करा अन्यथा दि. ११ एफिलला रोज सोमवारला ठानेगाव फाट्यावर सकाळी ११ वाजता चकाजाम आंदोलन करण्यात येईल असा इशारा
गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम.माक्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अमोल मारकवार प्रहार जनशक्ती पक्षाचे निखिल धार्मिक यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा  जिल्हाधिकारी यांना निवेदनातून दिला आहे.
यावेळी
 ग्रा.प.सदस्य शेखर धदरे पुंडलिक मानागडे राजु सातपुते  किशोर भोयर खेमराज सामृतवार रामा म्हशाखेत्री रुषी मगरे दिपक बानबले  आनंदराव बावणे कामचद ढवळे संतोष उपरीकर योगेश ठेवले राजु पिपरे नरेश टिपरे यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post