तर तुझ्या बायकोला एका रात्रीसाठी आमच्याकडे पाठव ‘, अभियंता निलंबित तर..

उत्तर प्रदेश:- देशात एका धक्कादायक घटना समोर आलेली असून बदली टाळावी म्हणून एका सरकारी अधिकाऱ्याने चक्क आपल्या हाताखाली असलेल्या लाईनमनकडे बायको पाठवण्याची मागणी गेली आणि त्यातून आलेल्या निराशेतून या कर्मचाऱ्याने आत्महत्या केली. कायदा सुव्यवस्थेचे डांगोरे पिटत असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये ही घटना उघडकीस आली आहे . लखीमपुर खीरी परिसरात ‘ तुझी पत्नी रात्रभर माझ्याकडे पाठव ‘ असे सांगितल्यानंतर उत्तर प्रदेश वीज महामंडळाच्या एका कर्मचाऱ्याने कनिष्ठ अभियंत्याच्या घराबाहेर स्वतःला पेटवून घेत जीवन संपवले आहे. रविवारी रात्री ही घटना घडली आहे .

पोलिसांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार कनिष्ठ अभियंता असलेला नागेंद्र कुमार याने बदलीसाठी लाईनमन असलेल्या गोकुळ प्रसाद नावाच्या एका 42 वर्षीय कर्मचाऱ्याकडे एक लाख रुपये मागितले होते आणि सोबतच गोकुल प्रसाद या लाईनमनकडे चक्क एक रात्र बायको पाठवण्यास सांगितले . कनिष्ठ अभियंता नागेंद्र कुमार आणि एक दुसरा एक लाईनमन जगतपाल यास निलंबित करण्यात आलेले आहे.

गोकुल प्रसाद यांनी आत्महत्या करण्याआधी व्हायरल व्हिडिओ बनवलेला असल्याने ही घटना समोर आली त्यामध्ये कनिष्ठ अभियंता याने एक लाख रुपये मागितले तसेच पण बदली करण्यासाठी तुझ्या पत्नीला माझ्या कडे रात्रभर पाठव असे देखील तो म्हणाला. हा मानसिक त्रास गोकुल यांना सहन झाला नाही आणि त्यांनी स्वतःला या अभियंत्याच्या घरासमोरच पेटवून घेतले. गंभीर जळालेल्या अवस्थेत त्यांना लखीमपुरच्या इस्पितळात नेण्यात आले मात्र रविवारी त्याचा मृत्यू झाला. गोकुल प्रसाद यांचे वय ४५ वर्षे असून ते ऊर्जा विभागात काम करत होते.

गोकुल प्रसाद यांनी व्हिडीओमध्ये आपण टोकाचं पाऊल उचलण्याचं कारण सांगताना पोलिसांनी देखील आपल्याला मदत केली नाही असेही म्हटले आहे तर त्यांच्या पत्नीने आरोपी गेल्या तीन वर्षांपासून पतीला त्रास देत असल्याचा आरोप केला. “माझे पती तणावात गेले होते. औषधोपचार सुरु असतानाही त्यांना त्रास देणं सुरु होतं. त्यांची बदली दुसऱ्या ठिकाणी करण्यात आली होती जिथे त्यांना प्रवास करताना त्रास होत होता. त्यामुळे त्यांनी घऱाजवळ बदली करण्याची मागणी केली होती. यावेळी त्यांनी पत्नीला एका रात्रीसाठी आमच्याकडे पाठव आणि आम्ही तुझी बदली करु असं सांगितलं होतं,” अशी माहिती पत्नीने दिली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post