बायकोच्या मामाची मुलगी गावी आली अन ‘ त्रास ‘ वाढला

महाराष्ट्रात एक वेगळीच घटना सोलापूर जिल्ह्यात समोर आलेली असून पत्नीच्या मामाच्या मुलीशी प्रेम संबंध निर्माण करून तिच्या सांगण्यावरून पत्नीला मारहाण करत शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी माढा तालुक्यातील अकोले बु येथील चार जणांच्या विरोधात करमाळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये पती, सासू, दीर आणि संबंधित मामाच्या मुलीचा देखील समावेश आहे. सदर प्रकरणी करमाळा शहरातील कृष्णाजी नगर येथे एका महिलेने फिर्याद दिलेली आहे.


फिर्यादी महिलेचा विवाह 5 जुलै 2012 मध्ये माढा तालुक्यातील एका मुलाशी झाला होता त्यानंतर त्याने सहा महिने तिला कसेबसे नोंदवले आणि त्यानंतर माहेरी जायचे नाही असे सांगत सासू पती आणि दीर यांनी तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्रास द्यायला सुरु केले. बुलेट घ्यायची आहे आणि वडिलांकडून तू बुलेट घेऊन घे . सोन्याचे ब्रेसलेट घेऊन दे असे म्हणत तिला मारहाण करून उपाशी ठेवण्यात आले. त्यावेळी फिर्यादीच्या मामाची मुलगी शिक्षणासाठी करमाळा येथे होती यावेळी फिर्यादीचा पती आणि ती मुलगी यांच्यातच प्रेम संबंध सुरू झाले तेव्हापासून पत्नीचा त्रास वाढला, असे पीडितेचे म्हणणे आहे.

आरोपी पती हा फिर्यादीला मला तिच्यासोबत लग्न करायचे आहे. मला तू सोडचिट्ठी देऊन टाक असे म्हणत तिच्या सांगण्यावरून वारंवार पत्नीला मारहाण करत शिवीगाळ करायचा अखेर त्याला वैतागून फिर्यादी महिलाही 2016 माहेरी आली. 2012 मध्ये विवाह झाल्यापासून आतापर्यंत पीडितेचा नुसता छळच करण्यात आलेला आहे त्यामुळे अखेर तिने या चार जणांच्या विरोधात पोलिस ठाण्यात धाव घेतली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post