सापडला सापडला तलाठी सापडला

गडचिरोली - दि 11एप्रिल 22
दिवसेंदिवस लाच घेण्याचे प्रमाण वाढतच आहेत व कारवाई होत आहे परंतु धडा मात्र संबंधितांनी घेतला नाही, यातीलच गडचिरोली तहसील मधील हा एक प्रकार,तक्रारदार पुरुष, वय 24 वर्षे, मु. घारगाव पो. भेंडाळा,ता. चामोर्शी जि. गडचिरोली यांच्या तक्रारी वरुन सापळा रचण्यात आला त्यात आरोपी नामदेव हरीभाऊ चंदनखेडे, वय 46 वर्षे, धंदा नौकरी, तलाठी, साजा क्र. 12, तलाठी कार्यालय दोटकुली ता. जि. गडचिरोली यांना पकडण्यात acb ला यश आले.

सविस्तर वृत्त असे की,

तक्रारदाराच्या भावाच्या नावे खरेदी केलेल्या शेतजमिनीचे फेरफार करण्याच्या कामाकरिता आरोपी नामे नामदेव हरीभाऊ चंदनखेडे यांनी रुपये 5000/- लाच रक्कमेची मागणी करून पूर्वी रुपये5000/- लाच रक्कमेची मागणी करून पूर्वी रुपये 3000/- रुपये घेतले. आपले लोकसेवक पदाचा दुरुपयोग करुन स्वत:चे आर्थिक फायद्याकरीता वाम व भ्रष्ट मार्गाने स्वत: आरोपी यांनी पडताळणी नंतर रुपये 2000/- मागणी करून ती स्वीकारल्याने नमुद आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु आहे.

पोलीस अधीक्षक राकेश ओला, ला.प्र.वि. नागपूर परिक्षेत्र, नागपूर, मधुकर गिते, अप्पर पोलीस अधिक्षक, परिक्षेत्र नागपूर यांच्या मार्गदर्शनात सुरेंद्र गरड, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि. गडचिरोली. तपासी अधिकारी यांच्या सह सापळा कारवाई पथक स.फौ. प्रमोद ढोरे, पो.ह.वा. नथ्थू धोटे, पो.ना. राजेश पद्मगिरवार, श्रीनिवास संगोजी, म. पो. शी. विद्या मशाखेत्री, चा.पो.हवा. तुळशिराम नवघरे सर्व ला.प्र.वि. गडचिरोली यांनी सदर ची कारवाई केली.

Post a Comment

Previous Post Next Post