बालिकेचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलीस पाटलाला झाली अटक....

साकोली, :- स्टॅम्प आणण्यासाठी गेलेल्या 13 वर्षीय बालिकेचा दारूच्या नशेत तर्र असलेल्या पोलिस पाटलाने विनयभंग केल्याची घटना तालुक्यातील चिंगी येथे घडली. तक्रारीवरून साकोली पोलिसांनी पोलिस पाटलावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

चिंगा गावात पोलिस पाटील यांच्या घरासमोर महिला बचतगटाची बैठक सुरू होती. यावेळी महिलांना स्टॅम्प पाहिजे असल्याने त्यांनी 13 वर्षीय बालिकेला पोलिस पाटील यांच्या घरी पाठविले. यावेळी पोलिस पाटील हा दारू पिऊन तर्र असल्याने त्याने बालिकेसोबत छेड खा नी करून तिचा विनयभंग केला. या घटनेची माहिती पीडित बालिकेने आपल्या वडिलांना दिली. वडिलांच्या तक्रारीवरून साकोली पोलिसांनी पोलिस पाटील संजय रामटेके यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सेलोकर करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post