'तसल्या ‘ व्हिडिओमधील हिरॉईन ही चक्क आपलीच बायको आहे या संशयामुळे तिचा केला अमानुषपणे खून

बंगलोर:- इंटरनेटवरील ‘ तसल्या’ व्हिडिओमध्ये असलेली हिरॉईन ही चक्क आपलीच बायको असल्याचा संशय एका व्यक्तीला आला आणि त्याने तिचा अमानुषपणे खून केला. चक्क पाच मुले असलेल्या या महिलेच्या पतीने तिचा खून केला असून पाचही मुलांच्या देखतच बापानं त्यांच्या आईची हत्या केली आहे. ‘ तसल्या ‘ व्हिडिओमधील हिरॉईन ही चक्क आपलीच बायको आहे असे त्याला वाटू लागले आणि याच संशयातून इसमानं आपल्याच पत्नीवर शंका घेतली आणि तिची हत्याही केली.
जहीर पाशा असे या नराधमाचे नाव असून तो रिक्षा चालवण्याचं काम करायचा. जहीर पाशाचं मुनीबासोबत २५ वर्षांपूर्वी लग्न झालं होत त्यानंतर त्यांना पाच मुले देखील झाली मात्र दरम्यानच्या काळात पाशा याला इंटरनेटवर तसले व्हिडीओ पाहण्याचा नाद लागला आणि त्यातील एका व्हिडीओमध्ये आपलीच पत्नी असल्याचा संशय जहीर पाशाला आला त्यातून त्याने पत्नीवर संशय घ्यायला सुरुवात केली. दोन महिन्यांपासून त्याच्या डोक्यात हाच किडा वळवळत होता. पत्नीने वेळोवेळी सांगूनही त्याने तिचे ऐकून घेतले नाही.

दोन महिन्यांपूर्वी एक व्हिडीओ जहीर पाशानं पाहिला आणि त्या व्हिडीओत बायकोच असल्याचं त्याला वाटलं. तेव्हापासूनच त्याने बायकोचा छळ सुरु केला. एका घरगुती कार्यक्रमात काही कुरापत काढून त्याने बायकोला मारहाणही केली, असा आरोप पत्नीच्या कुटुंबीयांकडून केला जात आहे. मारहाण इतकी केली की मुनिबाला रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. मुनिबाच्या संतापलेल्या वडिलांनी पाशाच्या विरोधात पोलिस तक्रार दाखल करायचंही मनाशी पक्क केलं होतं पण मुनिबानं संसार टिकावा म्हणून त्यांना थांबवलं.

रविवारी सकाळी पाचही मुलांसमोर मुनिबाची हत्या जहीर पाशानं केली आणि एका मुलानं मुनिबाच्या घरी जाऊन आपल्या आजीआजोबांना आपल्या आईच्या हत्येबाबत सांगितलं. त्यानंतर ही घटना उघडकीस आली

Post a Comment

Previous Post Next Post