चिमुकल्या नातीला पुण्याहून चक्क हेलिकॉप्टरने आजोळी आणले

वांगी (जि. सांगली) : हिंगणगाव खुर्द (ता. कडेगाव) येथील सरपंच अशोक जाधव यांनी नातीच्या जन्माचे स्वागत अनोख्या पद्धतीने केले.

एकुलत्या एक कन्येस कन्यारत्न झाल्यानंतर जाधव यांनी चिमुकल्या नातीला पुण्याहून चक्क हेलिकॉप्टरने आजोळी आणले. गावातील रस्त्यांवर स्वागत कमानी उभारून फुलांची उधळण केली. बैंड आणि झांजपथकाच्या निनादात मिरवणूकही काढली.

Post a Comment

Previous Post Next Post