रानडुकराच्या हल्ल्यात तेंदूपत्ता महीला मजूर जखमी


चामोर्शी : वनपरिक्षेत्र कार्यालय कुनघाडा रै. अंतर्गत येणाऱ्या मुरमुरी जंगल परिसरात तेंदूपाने संकलनासाठी गेले असता रानडुकराने हल्ला केल्याने महिला जखमी झाली. विमलबाई नकटू दूधबळे (वय ४५, रा. तळोधी) असे जखमी महिलेचे नाव आहे. ही घटना ११ मे रोजी सकाळी १० वाजता घडली. अर्ज प्राप्त होताच कुनघाडा रै. वनपरिक्षेत्रातील वन कर्मचाऱ्यांनी घटनेचा पंचनामा केला आहे. पुढील तपास वन परिक्षेत्र अधिकारी महेशकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनात वनपाल विवेकानंद चांदेकर, वनरक्षक वर्षा मडावी, वनरक्षक एन. बी. गोटा, वनरक्षक ममता देवडे करीत आहेत

Post a Comment

Previous Post Next Post