गणिताच्या पुस्तकात अश्लिल चित्र छापली म्हणुन 27 अधिकाऱ्यांना कडक शिक्षा

चीन:- शाळेत गणित विषय समजायला अवघड मानला जातो. त्यामुळेच सोपी भाषा तसेच चित्र दाखवून जगभरात गणित विषय शिकवला जातो. मात्र चिनमध्ये गणिताच्या पुस्तकात असे आक्षेपार्ह चित्र छापलेत ज्यामुळे 27 अधिकाऱ्यांना कडक शिक्षा देण्यात आली आहे. चिनमध्ये गणिताच्या पुस्तकात अश्लील चित्र छापण्यात आली होती. त्यावरून बराच गदारोळ माजला. या चित्रांचे वर्णन 'दुःखदपणे कुरुप' आणि चुकिच्या पध्दतीने लैंगिक विचार पसरवणारे असल्याचे लोकांचे म्हणणे आहे.

या पुस्तकाची जगभर चर्चा होत आहे. या चित्रांमध्ये दाखवलेले मुलांचे कपडे आणि वागणूक सभ्य नव्हती. या चित्रात मुले मुलींचे स्कर्ट घट्ट पकडत आहेत तर मुलाच्या पायावर टॅटू दिसत आहे. या छायाचित्रांमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. चीनच्या शिक्षण मंत्रालयाने अहवाल दिला की या पुस्तकातील चिनी शाळकरी मुलांचे चित्र अंत्यत चुकिचे दर्शवले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post