देश विकणार्‍या मोदींनी त्यांचा मित्र अदानीमुळे एमएसपी लागू करत नाहीत मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांचा शाब्दिक प्रहार

मेघालय: देश विकणार्‍या नरेंद्र मोदींनी त्यांचा मित्र अदानीमुळे एमएसपी लागू करत नाहीत असा शाब्दिक प्रकार मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केला आहे.


ते म्हणाले, देशातील शेतकर्‍यांचा पराभव होऊ शकत नाही आणि त्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. एमएसपी लागू होत नाही कारण प्रधामंत्री नरेंद्र मोदींचा अदानी नावाचा मित्र आहे, जो गेल्या पाच वर्षांत आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला आहे. हरियाणातील नूह येथील किरा गावात एका गोशाळेच्या कार्यक्रमात ते बोलत होते.


जर एमएसपी लागू केला नाही आणि एमएसपीवर कायदेशीर हमी दिली नाही, तर आणखी एक लढा होईल आणि यावेळी ही लढाई भयंकर असेल. या देशातील शेतकर्‍याला तुम्ही पराभूत करू शकत नाही. तुम्ही त्याला घाबरवू शकत नाही. तुम्ही ईडी किंवा आयकर अधिकारी पाठवू शकत नसल्यामुळे, तुम्ही शेतकर्‍याला कसे घाबरवणार? असा हल्लाबोल मलिक यांनी केला.



गुवाहाटी विमानतळावर मला पुष्पगुच्छ घेतलेली एक महिला भेटली. जेव्हा मी तिला विचारले की तुम्ही कोठून आला आहे, तेव्हा तिने उत्तर दिले की आम्ही अदानींकडून आलो आहोत. मी विचारले याचा अर्थ काय? तर त्या म्हणाल्या की, हे विमानतळ अदानी यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. अदानीकडे विमानतळ, बंदरे, मोठमोठ्या योजना दिल्या आहेत आणि एक प्रकारे देश विकाला आहे. पण आम्ही तसे होऊ देणार नाही.


मलिक पुढे म्हणाले, अदानी यांनी पानिपतमध्ये एक मोठे गोदाम बांधले आहे आणि त्यात स्वस्त दरात खरेदी केलेला गहू ठेवला आहे. जेव्हा महागाई असेल तेव्हा तो गहू विकेल. अशा प्रधानमंत्र्यांचे मित्र नफा कमावतील आणि शेतकर्‍यांचे नुकसान होईल. हे खपवून घेतले जाणार नाही आणि याविरोधात लढा उभारला जाईल.

Post a Comment

Previous Post Next Post