जोगीसाखरा परिसरात सततच्या अतिवृष्टीमुळे नदी नाल्याला पुर अनेक पिके व घराची पडझड


जोगीसाखरा - मागील तीन ते चार दिवसापासून जोगीसाखरा परिसरात पावसाचे कहरसुरू असल्यामुळे जोगीसाखरा जवळील गाढवी नदीला पूर असल्यामुळे या नदीवरून पाणी पुलियाच्यावर गेल्याने तसेच पळसगाव जोगीसाखरा रस्त्यावरील नाल्याच्या पुलियाच्यावर तिन फुट पाणी असल्यामुळे मार्ग बंद पडल्यामुळे विद्यार्थ्यी व नागरीकाना आरमोरी येथे जाता येऊ शकले नाही तसेच जोगीसाखरा रामपुर कासवी पळसगाव आष्टा येथील शेतकऱ्यांचे धान पिकात नदि नाल्याचे पाणी सिरल्यामुळे पिकाची मोठ्या प्रमाणात नुकसान झाली तसेच जोगीसाखरा येथील रामदास सयाम देवानंद गजभिये रामपुर येथील देवराव ठाकरे कासवी येथील नानाजी पुराम घनश्याम सयाम तात्याजी पाकडे सुकाजी पुसामसह अन्य नागरीकांच्या घराची पडझम होऊन मोठी नुकसान झाली आहे .



तसेच गेल्या चार पाच वर्षांपासून पावसाळ्यात पावसाच्या पाण्याने जोगीसाखरा पळसगाव पाथरगोटा जोगीसाखरा डांबरीकरण रस्त्यावर असलेल्या नाल्यावरील पुलियाच्यावर पाणी राहुन रहदारी बंद राहतो समधी वारंवार पुलियाची उच्ची वाढविण्याची मागणी होत आहे परंतु अजुन पर्यंत कोणताच नाल्यावरील पुलिया मंजुर न झाल्याने याची झळ दरवर्षी नागरीकांना पोहचत आहे हे विशेषयासमधी गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम यांनी पुरपरीस्थितीची पाहणी करुन नदि नाल्या लगतच्या शेतकऱ्यांचे धान पिक पाण्यासाली गेल्याने नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना व अतिवृष्टीमुळे घरे पडलेल्याचे सवै करुन नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शासनाकडे केली आहे.




Post a Comment

Previous Post Next Post