अन्... या अधिकाऱ्याने तर चक्क टॉयलेटमध्ये लाच स्वीकारली

नाशिक, : नाशिकच्या (Nashik ) आदिवासी विकास भवनात (tribal development department nashik) आणखी एक लाचखोर जाळ्यात अडकला आहे. या अधिकाऱ्याने तर चक्क टॉयलेटमध्ये लाच स्वीकारली. गमंत म्हणजे, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून या अधिकाऱ्याला पकडले. नाशिकमध्ये अधिकारी वर्गामध्ये सध्या काय चाललंय, असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वीच आदिवासी विकास विभागाचे मुख्यालयात एका एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर दिनेशकुमार बागुलला 28 लाखांची लाच घेताना अटक करण्यात आली होती. हे प्रकरण ताजे असताना आता आणखी एका लाचखोर अधिकाऱ्याला पकडण्यात आले आहे. प्रताप वडजे असं या लाचखोर अधिकाऱ्याचं नाव आहे. वडजे हा आदिवासी विभागाच्या सहाय्यक प्रकल्प अधिकारी पदावर कार्यरत आहे. रोजंदारीवरील पद स्वयंपाकी किंवा कामाठी करण्याच्या मोबदल्यात या वडजेने लाच मागितली होती. तक्रारदाराच्या पत्नीचे रोजंदारीवरील पद स्वयंपाकी ऐवजी सफाईगार असे आदेश काढले होते. त्या कामाठी किवा स्वयंपाकी असं नव्याने आदेश बदलून देण्याची विनंती केली होती. 


या कामाच्या मोबदल्यात 10 हजार रुपये लाचेची मागणी वडजे याने केली होती. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला याची माहिती दिली. (उसाची नोंदणी आता आपल्या मोबाईवरून होणार, असे आहे ‘महा-ऊस नोंदणी’ ॲप) ठरल्यानुसार, 29 ऑगस्ट रोजी वडजे याने पैसे घेऊन बोलावले आणि टॉयलेटमध्ये त्याने 10 हजार स्विकारले. पण आधीच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचला होता. वडजेला 10 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

Post a Comment

Previous Post Next Post