अरे बापरे अन घर गेला ७० फूट खोलात...

घुग्घूस (चंद्रपूर) : येथील अमराई वार्डाता खळबळजनक घटना घडली आहे. येथे वास्तव्यस असणारे गजानन मड़ावी यांचे घर अचानकपने हलायला लागले. त्यामुळे कुटूंब घाबरले. घाबरलेल्या स्थितीत घरातील सदस्य घराबाहेर पडलेत. त्याच वेळी अचानकपणे घर जमीनीत सत्तर ते अंशी फुट आत जमिनीत गेले. सदर घटना वेकोलीच्या खानीमुळेच घडत असल्याचा आरोप नागरिकांचा आहे.

सदर घटनेची माहिती मिळताच कांग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यानी जिल्हाधिकारी, तहसिलदार वेकोली अधिकारी यांना घटनेची माहिती दिली. कांग्रेस नेते सैय्यद अनवर यानी घटनास्थळी धाव घेवून महावितरण अधिकारी दुमने यांना सांगून विद्युत पुरवठा बंदा करायला लावला. ठानेदार बबन राव पूसाटे यांना बोलाविण्यात आला. घटनास्थळी बघ्यांनी एकच गर्दी केली होती. पोलीसांनी गर्दी पांगाविण्याचे काम केले. घटनास्थळी कांग्रेसचे नेते रोशन पचारे, पवन आगदारी, दंतलवार, नुरुल सिद्दीकी उपस्थित होते. या घटनेने शहरात दहशत निर्माण झाली आहे.





Post a Comment

Previous Post Next Post