बैल पोळ्याच्या दिवशी वैरागड सर्पमित्रांनी दिला दोन सापांना जीवनदान.

वैरागड : - पोळ्याच्या दिवशी धाब्याच्या स्वयंपाक घरात असलेल्या कवड्या आणि वाशा साप अशा दोन बिन विषारी सापाला पकडून वैरागड येथील वृक्षवल्ली वन्यजीव संरक्षण संस्था आरमोरी सदस्य सर्पमित्र प्रलय सहारे आणि प्रवज्जा प्रलय सहारे यांनी जीवनदान दिल्याची घटना घडली.

सर्वत्र पोळ्याचा सन साजरा करीत असताना भ्रमणध्वनी वरून पूनित्त बावनकर यांनी धब्यामध्ये दोन साप असल्याची माहिती सर्पमित्र प्रलय सहारे यांना दिली. तात्काळ वैरागड पासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या MH-33 नामक धाबा गाठून येथील कर्मचाऱ्यांना विचारपूस केली असता स्वयंपाक घरात साप असल्याची माहिती मिळाली. सर्पमित्रांनी सामानाची पाहणी केली असता एक कवड्या (comman wolf snake) साप दिसला त्याला सुरक्षित पकडून डब्यात टाकण्यात आले. त्यानंतर इतरत्र दुसऱ्या सापाला शोध घेतला असता. रिफ्राजिरेटरच्या मागे वाशा साप असल्याचे आढळले. त्याला सुद्धा सुरक्षित पकडून वनविभाग यांना माहिती देऊन दोनही सापाला वन अधिवासात सोडण्यात आले. ऐन पोळ्याच्या दिवशी दोन सापांना जीवनदान दिल्याने सर्पमित्र प्रलय सहारे आणि प्रवज्जा प्रलय सहारे यांचे कौतुक होत आहे.


वृक्षवल्ली वन्यजीव संरक्षण संस्था आरमोरीचे पदाधिकारी सतरा वर्षा पासून साप, पक्षी आणि वन्यजीव प्राण्यांना जीवनदान देत असतात. सापांना पकडताना जीवाचा धोका निर्माण होते. जीव धोक्यात टाकून साप पकडीत असताना साहित्याची अडचण निर्माण होते. वनविभागाने आणि शासनाने सर्पमित्रांना साप पकडण्याचे स्टिक, चिमटा, जुत्ते, हातमोजे आणि मानधन देण्याची मागणी वृक्षवल्ली वन्यजीव संरक्षण संस्था आरमोरी यांच्या कडून केली जात आहे.


Post a Comment

Previous Post Next Post