ब्रम्हपुरी जवळील नाल्यात आढळला कुजलेला मृतदेह

ब्रम्हपुरी : शहरापासून तीन किमी अंतरावरील पारडगाव जवळील गराडी नाल्यात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत गुरुवारी सकाळी आढळला. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

आठ दिवसांपूर्वी वैनगंगा नदीला पूर आला होता. त्यामुळे परिसरातील नाले दुथडी भरून वाहत होते. याच पुरात एक मृतदेह नाल्यात वाहत येऊन झुडुपात अडकला असावा. गुरुवारी सकाळी नागरिकांना मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी पंचनामा करत घटनास्थळावरच शवविच्छेदन केले. वृत्त लिहिपर्यंत मृतकाची ओळख पटली नव्हती. पुढील तपास ब्रम्हपुरी पोलीस करत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post