वनश्री महाविद्यालयात 'हर घर तिरंगा' अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन

कोरची : स्थानिक कोरची येथील वनश्री कला व विज्ञान महाविद्यालयात भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्य *'हर घर तिरंगा'* हा उपक्रम *रासेयो व शारीरिक शिक्षण विभागाद्वारे* राबविला जात आहे. त्यामुळे महाविद्यालयात दिनांक १३ ते १७ ऑगष्ट दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्यानुसार दिनांक १४ ऑगष्टला सकाळी ८.०० वाजता प्रा. आर. एस. रोटके यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व नंतर देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेमध्ये एकूण १२ विद्यार्थी सहभागी झाले. याप्रसंगी डॉ. एम. डब्लू. रुखमोडे व प्रा. प्रदीप चापले यांनीही आपल्या सुमधूर सुरेख आवाजाचा परिचय दिला. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन कु. शितल शहारे हिने केले व गौरव शहारे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.


दिनांक १५ ऑगष्टला सकाळी ८.०० वाजता महाविद्यालय विकास समितीचे सदस्य मा. मनोज अग्रवाल यांच्या शुभ हस्ते ध्वाजारोहण करण्यात आले व त्यानंतर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्यात २१ विद्यार्थांनी सोहभाग नोंदविला.
सदर आयोजनात शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. एम. डब्ल्यू. रुखमोडे, रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. विनोद चहारे, प्रा. आर. एस. रोटके, प्रा. प्रदीप चापले, प्रा. सी. एस. मांडवे, प्रा. एस. एस. दोनाडकर, श्री. राजकुमार पिलारे, श्री. अरुण ऊईके, महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी, रासेयो स्वयंसेवक व महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.


Post a Comment

Previous Post Next Post