शेतकऱ्याची गळफास लावून आत्महत्या

गडचिरोली : शहरापासून १० किलोमीटरवर असलेल्या कनेरी येथे एका शेतकऱ्याने शेतातील एका झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. गणपत कोलते (वय ६५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. 



प्राप्त माहितीनुसार, कोलते यांनी सोमवारी रात्री नेहमीप्रमाणे कुटुंबीयांसोबत जेवण केले. मात्र, मध्यरात्री सर्वजण झोपेत असताना कोलते यांनी उठून शेत गाठले आणि झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. सकाळी हा प्रकार उघडकीस आला. गडचिरोली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

शिक्षकाला विद्यार्थ्यांनी केली बेदम मारहाण...






Post a Comment

Previous Post Next Post