रांगी - बेलगाव येथे वाघ आणि बिबट्याचा धुमाकूळ

धानोरा:- तालुक्यातील रांगी परिसरात मागील काही दिवसांपासून वाघ व बिबट्याची दहशत आहे. परिसरातील नागरिकांना वेळोवेळी वाघ व बिबट्याचे दर्शन होत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. परिसरात जीवितहानी होण्याची शक्यता असल्याने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली.


व्हिडियो
👇👇👇👇👇





रांगी परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने वनविभागाने गावागावांत फलक लावले. परिसरातील बोरी, निमगाव, रांगी, बेलगाव, मोहटोला, मासरगाटा आदी गावांतील लोकांना बिबट्याचे दर्शन होत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मागील पंधरवड्यात बेलगाव येथील बैलाची शिकार बिबट्याने केली तसेच निमगाव फाट्यावर आणि जंगल परिसरात बिबट्याचे दर्शन काही लोकांना झाले. रांगी - निमगाव व रांगी-मौशिखांब गडचिरोली मार्गाने ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या मनात भीती आहे. त्यामुळे वाघ व बिबट्याचा वनविभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली.

टेंभा, चांभार्डा भागातही वाघाचा वावर

■ गडचिरोली तालुक्यातील टेंभा, चांभार्डा, गणपूर, मरेगाव जंगल परिसरात गेल्या दोन वर्षापासून वाघाचा वावर आहे. परंतु घनदाट जंगल व डोंगराळ भाग असल्याने याच परिसरात तो वावरतो.

व्हिडियो
👇👇👇👇👇


Post a Comment

Previous Post Next Post