चक्क नश्या येण्यासाठी केला जातो कंडोमचा वापर

पश्चिम बंगाल:- अपत्यप्राप्ती नको म्हणून अनेक जण शारीरिक संबंध ठेवताना कंडोमचा वापर करतात मात्र एक वेगळीच घटना पश्चिम बंगाल येथे समोर आलेली असून पश्चिम बंगाल येथे चक्क कंडोमचा मोठा तुटवडा निर्माण झालेला आहे. सुरुवातीला हा प्रकार का झाला हे दुकानदारांच्याही लक्षात आले नाही मात्र त्यानंतर खरेदीदार यांच्याकडून दुकानदारांनी माहिती घेतली असता काही नागरिक चक्क नशा करण्यासाठी कंडोमचा वापर करत असल्याचे समोर आले आहे.

आत्तापर्यंत व्हाइटनर, आयोडेक्स याच्या माध्यमातून नशा केले जाण्याचे प्रकार समोर आले होते मात्र हा नवीनच प्रकार उघडकीस आलेला आहे. एका दुकानदाराने एका तरुण मुलाला खोदून माहिती विचारली त्यावेळी त्याने सुरुवातीला बोलण्यास नकार दिला मात्र त्यानंतर त्याने जे सांगितले ते ऐकून दुकानदार देखील हैराण झाला. कंडोममध्ये सुगंधी द्रव्य वापरलेली असतात. ती वितळल्या नंतर अल्कोहोल तयार करतात आणि हे पाणी आणि त्याची वाफ यातून नशा मिळते असे या युवकाने सांगितले

सदर प्रकाराची खातरजमा करून घेतली असता कंडोम गरम पाण्यात जास्त काळ ठेवल्यास त्यामधील सुगंधी द्रव्य ही पाण्यात विरघळतात आणि हे पाणी एक प्रकारची नशा आणते. काहीजण या पाण्याची वाफ घेऊन देखील नशा करत आहेत तर काही जण चक्क हे पाणी पीत असल्याचे देखील प्रकार समोर आलेले आहेत मात्र मोठ्या प्रमाणात यामुळे कंडोमचा तुटवडा निर्माण झालेला आहे. सदर प्रकार आरोग्यास घातक असून असे न करण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post