रानडुक्कराच्या मासांची अवैधरित्या वाहतूक करण्या-या दोन आरोपींना अटक*

चामोर्शी वनरिक्षेत्राची कारवाई

चामोर्शी:- दि.29.07.2022 रोजी चामोर्शी वनपरिक्षेत्रा अंतर्गत जामगिरी उपक्षेत्रातील आम्रपाली नियतक्षेत्रात सामूहिक गस्त करीत असताना रश्मीपुर ते रविंद्रपुर मार्गाने मोटार सायकलने रानडुक्कराचे मासांची अवैधरित्या वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली त्या माहितीच्या आधारे रश्मीपुर ते रविंद्रपुर मार्गावर पाळत ठेवली असता दोन इसम मोटार सायकल MH-33-K5421 वर प्लास्टिक बारदाण्या मध्ये काही तरी वाहतूक करीत असल्याचे दिसून आले. त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी गाडी न थांबविता पळाले त्यांचा पाठलाग करून जामगिरी ते रवींद्रपूर रस्त्यावर पुन्हा अडविण्यात आले परंतु त्यांनी मोटार सायकल व प्लास्टिक बारदाना तिथेच ठेऊन सुसाट पळ काढला त्यांचा पाठलाग केला असता ते मिळाले नाही . 
त्यानंतर सदर प्लास्टिक बारदाण्याची तपासणी केली असता त्यामध्ये रानडुक्कराचे मांस आढळून आले. तेव्हा अज्ञात आरोपी विरुद्ध वनगुन्हा क्रमांक- 08181/204505/04/2022 दि.29.07.2022 नुसार गुन्हा नोंद करून आरोपींचा पुढील तपास सुरू असताना दि.02.08.2022 रोजी 1.विजय विकास सरदार रा.रविंद्रपुर 2.मनोजित दुखिराम गाईन रा.रविंद्रपुर या दोन संशयित आरोपींची नावे समोर आली त्यांची चौकशी केली असता त्यांनी सदर वनगुन्हा मान्य केला तेव्हा दि.02.03.2022 आरोपींना अटक करून दि.03.08.2022 रोजी मा. न्यायदंडाधिकारी, चामोर्शी यांचे दालनात हजर करण्यात केले असता. न्यायालयाने आरोपींना दि.03.08.2022 ते 16.08.2022 पर्यंत MCR मंजुर करून आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

या घटनेचा पुढील तपास मा.राहुलसिंह टोलीया ,उपवनसंरक्षक, श्री.प्रदिप बुधनवर प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी, आलापल्ली यांचे मार्गदर्शनाखाली श्री.आर.बी.इंवाते यांच्या नेतृत्वात श्री.सिध्दार्थ गोवर्धन क्षेत्र सहाय्यक, जामगिरी श्री.नागोसे ,वनरक्षक जामगिरी , गावडे वनरक्षक, शेख वनरक्षक,कुमरे वनरक्षक, तोंबर्लावार मॅडम , आनंद साखरे वनरक्षक, दिपक दुधबावरे वाहन चालक आदी कर्मचारी करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post