बैल पोळ्याच्या दिवशी शेतकऱ्यावर वाघाचा हल्ला

मुल - आज शेतकरी बांधवांचा पोळा हा महत्वाचा सण शेतकरी आपल्या घरी असलेल्या बैल, गाई, सह इतर गुरांना आंघोळ घालून रंग देऊन मोठ्या उत्साहाने सजवतात त्याला मारुतीच्या देवळात नेऊन दर्शन घेतात नैवेद्य घालून मगच शेतकरी बांधव जेवण करतात ही रूढी परंपरा सर्वत्र अजूनही राखली जात आहे.

अशाच महत्वाच्या सणाच्या दिवशी मुल तालुक्यातील मौजे चितेगावं येथील शेतकरी युवक रवींद्र श्रीरंग गोहणे वय (४५) आपल्या बैल व इतर जनावरांना घेऊन चारा चारत असताना शेतशिवारा लगत असलेल्या वनपरिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक सावली उपशेत्र राजोलीच्या चितेगावं बिटातील कक्ष क्रमांक १७७८ मधील जंगलात दबा धरून बसलेल्या वाघाने रवींद्र गोहणे यांचेवर हल्ला करून गंभीर जखमी केले. Tadoba tiger याबाबतची माहिती गावकऱ्यांना कळताच बीट गार्ड धनवीजय यांनी ग्रामस्थांना घेऊन तात्काळ उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय मुल येथे भरती करण्यात आले असून प्राथमिक उपचारानंतर चंद्रपूर येथील जिल्हा रुग्णालय येथे हलविण्यात आले.


ऐन शेतकऱ्यांच्या बैल पोळ्याच्या सणाच्या दिवशी शेतकऱ्यांवर वाघाने हल्ला केल्याने चीतेगावत पोळ्याच्या सनावर विर्जन पडल्याने गावात उत्साहात देखील शेतकरी नाराज होऊन बसले आहेत. याभागात नेहमीच वाघाची दहशत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. यावर वनविभागाने व वनाधिकारी यांनी वाघाचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी चितेगावं व परिसरातील गावकऱ्यांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post