धानोरा तालुक्यात बिबट्या मृतावस्थेत आढळला...

धानोरा : तालुक्यातील लेखा जंगलात शनिवारी सायंकाळी बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. मात्र, बिबट्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नाही.

तुकूम येथील नियत वनरक्षक वाय. पी. राऊत हे गस्त करीत असताना, त्यांना नर बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. वनाधिकारी यांनी मोकास्थळी जाऊन घटनास्थळाचा मोका पंचनामा केला. ही घटना सायंकाळची असल्यामुळे व पंचनाम्यास बराच वेळ झाल्यामुळे बिबट्याचे शवविच्छेदन करता आले नाही. त्यामुळे मृत बिबट्याला वनपरिक्षेत्र कार्यालय धानोरा येथे सुरक्षित ठिकाणी ठेवले. शनिवारी शवविच्छेदन करण्यात आले होते.

बिबट्याचा मृत्यू कशामुळे झाला, हे कळू शकले नाही. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच बिबट्याचा मृत्यू कशामुळे झाला हे कळणार.
सदर बिबट्या दोन ते अडीच वर्षांचा असल्याचा अंदाज आहे. त्याच्या शरीरावर कोणतीही जखम नसून, त्याचे सर्व अवयव कायम होते. बिबट्याला विक्री डेपो धानोरा येथे जाळण्यात आले. पुढील तपास उपवनसंरक्षक मिलीश शर्मा यांच्या मार्गदर्शनात, सहायक वनसंरक्षक सोनल भडके व वनपरिक्षेत्र अधिकारी केळवतकर करीत आहेत. शवविच्छेदनाच्यावेळी डॉ. रोहन गालफाडे, डॉ. लक्ष्मीकांत ढगारे, डॉ. देविदास लोखंडे मानद वन्यजीवरक्षक अजय कुकुडकर हजर होते.

Post a Comment

Previous Post Next Post