संदीपजी नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त नेरूळ मध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन

विरेंद्र म्हात्रे उपसंपादक नवी मुंबई : ऐरोली विधानसभा क्षेत्राचे प्रथम आमदार मा.श्री. संदीपजी नाईक साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त नेरुळ गावचे युवा माजी नगरसेवक श्री. गिरीश कान्हा म्हात्रे यांच्या नेतृत्वा मध्ये नेरूळ मध्ये बामदेव मैदाना वृक्षारोपणाचा कार्यक्रम तसेच नेरुळ गावचे युवा माजी नगरसेवक श्री गिरीश म्हात्रे यांच्या जनसर्पंक कार्यालयात मोफत डोळे तपासणी व अल्प दरात चष्मा वाटप शिबीराचे आयोजन करण्यात आले होते . सदर कार्यक्रमा प्रसंगी नेरुळ गावचे युवा माजी नगरसेवक श्री गिरीश म्हात्रे समाजसेवी श्री. शेखर भोपी, श्री. अक्षय पाटील श्री. गणपतबुवा भोपी , श्री निरंत पाटील, युवा युवा उद्योजक श्री. जितेश म्हात्रे,श्री. संदेश गायकवाड,श्री. अरविंद ठाकुर,श्री. विनोद म्हात्रे,श्री. निलेश ठाकुर ,श्री. निलेश भोपी, श्री. तुषार म्हात्रे आदी मान्यवर व नेरुळ मधील नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post