कुकडेल येथे आंतरराष्ट्रीय मूलनिवासी दिवस साजरा

कोरची :- वरून पुर्व दिशेला 6कि. मी. अंतरावर असलेल्या कुकडेल या गावी आज दिनांक 9आगस्ट 2022 ला सकाळी 9 वा.आंतरराष्ट्रीय मूलनिवासी दिवस साजरा करण्यात आला कार्यक्रमात ध्वजरोहक म्हणून गाव पुजारी श्री संकेर तुलावी यांच्या हस्ते ध्वज फडकविण्यात आला कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष स्थान मन्साराम नुरूटी तर प्रमुख पाहुणे सौ. बासमोती हलामी सरपंच ग्रामपंचायत दवडी, श्री.रमेश तुलावी उपसरपंच, श्री. रनेश कोरचा ग्रा. पं दवंडी,कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री भारत नुरूटी पोलीस पाटील यांनी केले तर कार्यक्रम प्रसंगी उपस्थित नागरिकांना श्री. रनेश कोरचा यांनी आंतरराष्ट्रीय मूलनिवासी दिवसा विषयी मार्गदर्शन केले. संचालन दिपक हलामी तर आभार प्रदर्शन प्रेम तुलावी यांनी मानले. कार्यक्रम यास्वित पार पाडण्याकरिता युवक युवती प्रयत्न केले.


Post a Comment

Previous Post Next Post