कार झाडावर धडकली; चालक जागीच ठार

कुरखेडा : मालेवाडा मार्गावर गोठणगावनजीक चारचाकी वाहन अनियंत्रित होऊन रस्त्याचा कडेला असलेल्या झाडावर धडकले. या अपघातात चालक घटनास्थळीच ठार झाला. सदर अपघात मंगळवारी सांयकाळी ७ वाजता घडला.

अपघातात मृत्युमुखी पडलेल्या चालकाचे नाव शेरीफ मेश्राम (२२, रा खांबाळा) असे आहे. तो चारचाकी
वाहनाने खांबाळाहून कुरखेडा येथे येत होता. यावेळी वाहनात चालकासह पुन्हा दोन व्यक्ती होते. मात्र त्याना सुदैवाने त्यांना कोणतीच दुखापत झाली नाही.

अपघाताची माहिती मिळताच गोठणगावचे उपसरपंच राम लांजेवार, पोलीस पाटील गोवर्धन नेवारे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष चांगदेव फाये, बंठी देवढगले व गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेत मदत केली.

Post a Comment

Previous Post Next Post