घेतला.... घेतला ..... तलाठी व कोतवालाने 2 हजारांची लाच

चंद्रपुर :- आजीच्या मृत्युनंतर आजीचे नाव कमी करून घेण्याकरिता तलाठ्याने 4 हजारांची मागणी केली होती त्यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तालाठ्यास व कोतवालास 2 हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली आले.



तक्रारदार मौजा धाबा येथे राहतो आणि शेतीचे काम करतो व पदवीने शिक्षण सुरू आहे तक्रारदार यांचे आजीचे नावांनी मौजा धावा येथिल शेत सर्व्हे न १४३ / २ मध्ये ० ८१ हे आर व मौजा कोंढाणा येथिल शेत सर्व्हे नं २४ मध्ये ०.५२ हे आर शेती जमीन होती. ति दिनांक ०२/०५/२०२१ रोजी मरण पावली आहे. तक्रारदार यांचे आजीच्या मृत्युनंतर आजीचे नाव कमी करून तक्रारदार व त्यांचे नातेवाईकांचे नाव मौजा धाबा येथिल सन १४३ /२ व कोणा येथिल सर्व्हे नं २४ च्या सातबारा रेकॉर्डला नोंद करण्याच्या कामाकरिता ४,०००/- रुपये ची लाच मागत असल्याबाबत तक्रारदार यांनी मोबाईल अॅप व्दारे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाये ऑनलाईन complaint@acbmaharastra.net वर तक्रार नोंदविली.




प्राप्त तक्रारीवरून दिनांक २६/०९/२०२२ रोजी ओंकार मदाडे, तलाठी, तलाठी कार्यालय धावा यांचेविरूध्द पडताळणी कार्यवाही केली असता तक्रारदार यांचे आजीच्या मृत्युनंतर आजीचे नाव कमी करून तक्रारदार व त्यांचे नातेवाईकांचे नाव मौजा धावा येथिल सर्व्हे न १४३/२ व कोंढाणा येथिल सर्व्हे नं २४ च्या सातबारा रेकॉर्डला नोंद करण्याच्या कामाकरिता तडजोडीअंती २,०००/ रूपये ची मागणी केली.

दिनांक २८/०९/२०२२ रोजी सापळा कार्यवाही दरम्यान ओंकार संजय भदाडे, तलाठी यांनी तक्रारदाराकडे २,०००/-रु. लाचेची मागणी करून चंद्रकात नेमचंद मुंजेकर, कोतवाल यांचे मार्फतीने लाच रक्कम स्विकारल्याने ओंकार संजयः भदाडे व चंद्रकांत नेमचंद मुजेकर यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

पुढील तपास कार्य सुरु आहे.

सदरची कार्यवाही ही श्री. राकेश ओला, पोलीस उपायुक्त / पोलीस अधिक्षक, ला.प्र.वि. नागपुर, श्री. मधुकर गिते, अप्पर पोलीस अधिक्षक, ला.प्र.वि. नागपूर, तसेच पोलीस उपअधिक्षक, श्री. अविनाश भामरे, ला.प्र.वि. चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात पो.नि. जितेंद्र गुरनुले, नापोकॉ. नरेशकुमार नन्नावरे, नापोका संदेश वाघमारे, पो.अ. राकेश जांभुळकर, म.पो.अ. पु. पा काचोळे, व चालक पो.अ. सतिश सिडाम ला.प्र.वि. चंद्रपुर यांनी यशस्वी पार पाडली आहे.



यापुढे जनतेला कोणीही लाचखोर अधिकारी / कर्मचारी किंवा त्यांचे वतीने कोणी खाजगी इसम लाचेची मागणी करीत असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post