वेगळा विदर्भ मागा भाऊ.... तरच होईल आपला विकास

गोंदिया:- महाराष्ट्र सरकारचा धिक्कार नोंदवत विदर्भ राज्य आंदोलन समिति गोंदिया जिल्हाच्या वतीने “नागपुर कराराची” होळी करण्यात आली. 28 सेप्टेंबर 1953 रोजी नागपुर करार करण्यात आला. त्याच आधारे 1960 मध्ये विदर्भ विलीन करून संयुक्त महाराष्ट्राची स्थापना करण्यात आली. तेव्हापासूनच विदर्भावर अन्याय सुरु आहे.



विदर्भातील विज, पाणी, कोळसा, खनिज, लोखंडा सह 23 प्रकारच्या खनिज सम्पत्तिचे दोहन सुरु करीत पश्चिम महाराष्ट्राला समृद्ध करण्यात आले. या विरोधात विदर्भ वाद्यांकडून 28 सेप्टेंबर हा काळा दिवस पाळला जातो. या वर्षी हे आंदोलन 11 जिल्ह्यात 120 तालुक्यात नागपुर कराराची होळी करण्यात आली.

गोंदिया येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक परिसर, प्रशासकीय भवन समोर “नागपुर कराराची” होळी करण्यात आली. या प्रसंगी गोंदिया जिल्हा विदर्भ राज्य आंदोलन समिति चे वरिष्ठ वसंत गवळी, समन्वयक अतुल सतदेवे, सुनील भोंगाड़े, रवि भांडारकर, राहुल खोब्रागडे, युवराज उपराडे, शुभम आहाके व अन्य विदर्भवादी कार्यकर्ते शामिल होते.

करारा नुसार विदर्भातील तरुणाना 23 टक्के सरकारी नोक-या, राज्याच्या तिजोरीतिल 23 टक्के वाटा, सिंचनासाठी 75 हज़ार कोटी देऊ केले; परंतु प्रत्यक्षात ते दिले नाही, या उलट येथील निसर्ग संपदा लुटून नेली. 69 वर्षापासून सुरु असणाऱ्या या लुटीचा नागपुर करार ची होळी करून निषेध नोंदविला गेला.

Post a Comment

Previous Post Next Post