ब्रह्मपुरी येथील एकाच कुटुंबातील 4 लोकांनी केली सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न

ब्रह्मपुरी:- ही धक्कादायक घटना घडली ब्रह्मपुरी येथील देलनवाडी अपार्टमेंट मध्ये, कुटुंब प्रमुख रमाकांत ठाकरे तहसील कार्यालयात अर्जूंनविस म्हणून काम करीत होते.  मुलांना नोकरी लागत नव्हती, आमच्यानंतर त्यांचं काय होणार? हा प्रश्न रमाकांत यांना सतावीत होता, घरात नोकरीच्या विषयावरून खटके उडत होते, परिस्थिती बेताची झाली, मुलांचं शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना चांगली नोकरी मिळेल अशी आशा रमाकांत यांना होती मात्र त्याउलट घडत होते.अखेर ठाकरे कुटुंबाने मोठा निर्णय घेतला, 24 सप्टेंबर ला मध्यरात्री संपूर्ण कुटुंबाने विष प्राशन केले.

यामध्ये रमाकांत यांच्या पत्नी गीता ठाकरे यांचा मृत्यू झाला तर रमाकांत दामोदर ठाकरे वडील वय 53, राहुल रमाकांत ठाकरे 27, मनोज रमाकांत ठाकरे वय 26 यांची परिस्थिती नाजूक आहे. मागच्या काही दिवसापासून त्यांचे हाती काम नव्हते. घराचा प्रपंच सांभाळताना त्यांना आर्थिक अडचणी मुळे खूपच त्रास होत होता. प्राप्त माहिती नुसार त्यांचे कडे मोबाईल रिचार्ज करता सुद्धा पैसे नसल्याने त्यांनी घरी असलेले मोबाईल विकून घराचा खर्च चालवला असल्याची धक्कादायक माहिती आहे.

शुक्रवारी ला मध्यरात्री चौघांनी मिळून चर्चा करून आत्महत्या करण्याचा विचार पक्का केला. रात्रीला 12 नंतर त्यांनी दोन तीन प्रकार कीटकनाशक मिस्क करून एक एक ग्लास ते प्राशन केले. दोन दिवसापासून त्यांनी काहीच खाल्ले नसल्याची माहिती आहे. विष घेतल्यानंतर ते काल दिवसभर अत्यावस्थेत पडून होते. आज अगदी पहाटे रमाकांत यांना थोडा होष आला तेव्हा त्यांनी बघितलं दोन्ही मुल जिवंत आहेत.

मात्र, पत्नी निपचित पडून दिसली. पहाटे 5 च्या दरम्यान रमाकांतने तशाच अवस्थेत सायकलने लहान भावाचे घर गाठून त्याला ही कल्पना दिली. रमाकांतचा भावाने लगेच आपल्या वाहनाने चारही लोकांना ग्रामीण रुग्णालय ब्रम्हपुरी येथे भरती केले. उपचारा दरम्यान गीता ठाकरे यांचे निधन झाले. तर पती रमाकांत यांना ब्रम्हपुरीतील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले तर दोन्ही मुलांना गडचिरोलीला उपचारार्थ पाठवण्यात आले आहे.

 आयुष्यात कितीही समस्या आल्या तरी त्यावर आत्महत्या हा पर्याय नाही, त्या समस्येला तोंड देत आयुष्याच्या पुढच्या वाटेवर जायला हवं, आत्महत्येचा विचार आपल्या मनात कधीही यायला नको, संघर्ष जीवन आहे आत्महत्या नाही. 


 घटनेचा पुढील तपास ब्रह्मपुरी पोलीस निरीक्षक रोशन यादव यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

Post a Comment

Previous Post Next Post