आरमोरी तालुक्यातील सिरसी ,कोजबी परिसरातील धान पिकावर खोड किडीचा प्रादुर्भाव .....! शेतकऱ्यांना कृषी विभागाने कीटकनाशक फवारणी करिता योग्य मार्गदर्शन करण्याची गरज ....!

दिनेश बनकर जिल्हा प्रतिनिधी
सुपर फाष्ट बातमी 7822082216


आरमोरी:- 
तालुक्यातील सिरसी कोजबी परिसरात
शेतातील धान पिकावर खोड किडीचा
प्रादुर्भाव सुरू झाल्याचे दिसून येत आहे .
यामुळे धनपिकाचे भरपूर प्रमाणात नुकसान होत आहे .खोड किडीला नष्ट करण्याकरिता योग्य ते कीटकनाशक शेतकऱ्यांना माहिती नसल्याने शेतकरी वर्ग कृषी केंद्र चालकाच्या सल्ल्याने मिळेल ती
कीटकनाशके घेऊन फवारणी करत
असल्याने खोड किडी वरती नियंत्रणमिळविणे अश्यक होत आहे .


आरमोरी तालुका कृषी विभाग यांनी
विभागाच्या मार्फतीने शेतकऱ्यांना
खोड किडीबद्धल योग्य तो फवारणी
बदल मार्गदर्शन करून शेतकऱ्यांना
सहकार्य करण्याची गरज आहे असे
शेतकरी वर्गातून बोलले जात आहे .


Post a Comment

Previous Post Next Post