मुरमाच्या खाणीत पोहायला गेलेल्या तीन मुलांचा झाला बुडून मृत्यू

दिनेश बनकर जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली


पवनी:- मुरमाच्या खाणीत पोहायला गेलेल्या तीन मुलांचा बुडून मृत्यू झाला ही घटना पवनी तालुक्यातील अत्री येथे २९ आॅगष्ट रोजी सायंकाळी 6:30 वाजताच्या सुमारास उघडकीस आली गावकरी व पोलिसांच्या मदतीने तिघांचेही मृत्यू देह बाहेर काढण्यात आले या घटनेने जनमानसात हळहळ व्यक्त केली जात असुन मृतकाच्या कुटुंबावर तसेच संपूर्ण अत्री गावावर शोककळा पसरली आहे.

प्रणय योगराज मेश्राम (17) संकेत बालक रंगारी (17 ) आणि साहिल नरेश रामटेके (19) तिघेही राहणार अत्री असे मृतकांची नावे आहेत तिघेही मित्र सोमवारी दुपारी ते बाहेर गेले होते मात्र सायंकाळपर्यंत घरी परत आली नाही. म्हणून त्यांचा शोध सुरू झाला गावाजवळ मुरमाच्या खाणीजवळ त्यांचे कपडे आणि चपला असल्याची माहिती मिळाली त्यामुळे गावकऱ्यांनी तिकडे धाव घेतली. या घटनेची माहिती अड्याळ पोलिसांना देण्यात आली ठाणेदार सुधीर बोरकुटे पथकासह घटनास्थळी रवाना झाले. अत्रीचे पोलीस पाटील संगीता सेलोटे, खैरीचे पोलीस पाटील देविदास डोकरे, नवेगावचे पोलीस पाटील भीमराव लोणारे, सरपंच रूपमा सेलोटे, उपसरपंच मिलिंद नंदागवळी, तंटामुक्ती अध्यक्ष श्रीपत मलोटे, कैलास मेश्राम, अतुल मलोटे भूषण डाकरे कुसन सेलोटे व पंचकोशीतील लोकांनी घटनास्थळी धाव घेऊन शोध मोहीम सुरू केली अखेर तासभरानंतर 8:30 च्या सुमारास तिघांचे मृतदेह सापडले.

   पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अड्याळ येथे पाठवून शवविच्छेदन करून दिनांक 30 रोजी मंगळवार ला कुटुंबांचे स्वाधीन केले तिन्ही मृत्यू दिवस शिवशंकर मुंगाटे यांचे स्वर्गरथातून सामूहिक अंतयात्रा काढून अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रणय व संकेत हे आई-वडिलांचे एकुलते एक मुले असल्याने त्यांच्या आई-वडिलावर दु:खाचे आभाळ कोसळले आहे. तर गावात आक्रोश, वेदना, हुंकार आणि आसवांनी मुके झालेले चेहरे बघून संपूर्ण गावात स्मशान शांतता पसरली असल्याचे चित्र दीसुन येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post