जयंत पाटील प्रदेशाध्यक्षांना कोरची तालुक्यातील समस्या सोडवण्यासंदर्भात पाठपुराव्याबाबत महिला तालुका अध्यक्षांचे निवेदन

दिनेश बनकर जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली


कोरची-
कोरची तालुका हा आदिवासी, नक्षलग्रस्त अतिसवेंदनसील असुन या तालुक्यात कोणत्याही प्रकारचे मोठे उद्योग-धंदे नाहीत. येथे बहुसंख्येने शेतकरी वास्तव्य करतात आणि हा तालुका अनेक वर्षापासून विविध समस्यानी ग्रस्त आहे. ३० ऑगस्ट २०२२ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब गडचिरोली दौऱ्यावर आले असता त्यांची भेट घेऊन कोरची तालुक्यातील समस्यांकडे प्रदेशाध्यक्षांनी प्रामुख्याने लक्ष द्यावे. अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाचे कोरची तालुकाध्यक्षा गिरजाताई कोरेटी तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष प्रेम उसेंडी यांनी जयंत पाटील साहेब, प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, तथा सदस्य विधीमंडळ मुंबई महाराष्ट्र राज्य यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.
          
 निवेदनामध्ये कोरची तालुक्यातील विद्युत समस्या कायमस्वरूपी सोडवणे. कोरची तालुक्यातील-कोटगुल (ढोललडोंगरी) येथे 33 के.व्ही. विद्युत उपकेंद्राचे काम त्वरित सुरु करणे. विविध कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे त्वरित भरणे तालुक्यातील शेतकरी कृषी पंप व विद्युत मिटर साठी मागणी केलेल्या शेतकऱ्यांचे विद्युत मिटर त्वरित जोडणे.तालुक्यातील कोटगुल येथे राष्ट्रीयकृत बँकेचे शाखा देण्यात यावे. भिमनखुजी-नारकसा-बोटेझरी रस्ता व पुलाचे बांधकाम करण्यात यावे. टेकामेटा गावात जाण्यासाठी रस्ता व पुल बांधण्यात यावे. गोटाटोला ते कोटगुल फाटा पर्यंत डांबरीकरण रस्ता मंजूर करुन काम करण्यात यावा, कोरची ते बोटेकसा रस्त्याच्या कामाला तात्काळ सुरू करणे. कोरची-नागपूर बस फेरी सुरू करणे. कोटगुल-गडचिरोली बस फेरी सुरु करणे. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात तालुक्यातील प्रत्येक ग्रामीण व पाड्यात इंटरनेट ची 4G सेवा देण्यात यावे. 
           

 कोटगुल वरुन छत्तीसगढ ला जाणाऱ्या मार्गात वाको गावालगतच्या पुढच्या नाल्यावर मोठा पुल बांधण्यात यावा. शिवनाथ नदीवर जल सिंचन प्रकल्प (एरीगेशन) मंजूर करून बांधण्यात यावे. तालुक्यातील दुग्गाटोला (कोटगुल) येथे मोठे धरण निर्माण करावे. कोटगुल ते वाको प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत निकृष्ठ दर्जाच्या रस्त्याच्या कामाची चौकशी करून कंत्राटदारावर तात्काळ कार्यवाही करावे. अशी निवेदनातून मागणी केली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोरचीचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post