कॅमेरे असूनही...... तो शिरला....

गडचिरोली/पेरमिली:- अहेरी तालुक्यातील आलापल्ली-भामरागड या मुख्य मार्गावर असलेले पेरमिली येथील महाराष्ट्र बँकेत राञीच्या सुमारास चोर शिरल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.या बँकेतील ही दुसरी घटना आहे.पेरमिली येथील परिसराकरिता बँक आँफ महाराष्ट्र ही एकमेव शाखा आहे.या बँकेला 25 ते 30 गावे जोडलेली आहेत.या बँकेत नेहमी गर्दी राहते.अशातच चोरांची नजर या बँकेवर पडली असावी.असा अंदाज वर्तविली जात आहे.दि.27 सप्टेबर रोजी राञीच्या सुमारास अंधाराचा फायदा घेत बँक फोडली.माञ चोरांच्या हातात एकही रूपया हाती लागला नाही.खाली हाती परतावे लागले.हे सर्व प्रकार बँकेत लावलेल्या सिसिटिवी कैद झाले असुन पुढिल तपास पेरमिली पोलीस करित आहे.

व्हिडियो




Post a Comment

Previous Post Next Post