वासुदेव बजागे यांना एक दिवस आपणास प्रो-कबड्डीत पंच म्हणून पाहायचे आहे - कनिष्ठ पर्यवेक्षक शिवदत्त कोठेकर



प्रतिनिधी : दिलीप अहिनवे, मुंबई
मुलुंड (मुंबई उपनगर), दि. ३० : मुलुंड 'टी' विभागात परिमंडळ क्र. ३ च्या १०६ शारीरिक शिक्षण शिक्षकांचा २८ सप्टेंबर रोजी उजळणी वर्ग घेण्यात आला. कबड्डी, खो-खो, लंगडी, हॅण्डबॉल, व्हॉलीबॉल व बास्केटबॉल खेळांचे नियम व सुधारित नियमांची माहिती देण्यात आली.
  मुंबई महापालिकेत कार्यरत असणारे शारीरिक शिक्षण शिक्षक अरविंद भांबळे यांनी व्हॉलीबॉल खेळाची सविस्तर व सोप्या भाषेत माहिती दिली. अनेक शिक्षकांनी आपले सहकारी किती छान प्रकारे शिकवु शकतात याबद्दल समाधान व्यक्त केले. आपल्या सहकाऱ्यांना नक्की काय सांगायला हवे हे केवळ आपलाच सहकारी समजु शकतो अशीही मते अनेक उपस्थित शिक्षकांनी व्यक्त केली. अरविंद भांबळे यांनी संपादन केलेल्या व्हॉलीबॉल खेळातील ज्ञानाला सर्वांनी दाद दिली.
          मुंबई महापालिका शारीरिक शिक्षण शिक्षकांमध्ये कबड्डी खेळासाठी ज्यांचे नेहमी आवर्जून नाव घेतले जाते ती व्यक्ती म्हणजे वासुदेव बजागे. केवळ १८ मिनीटात त्यांना कबड्डी खेळाची माहिती देण्याचे अवघड काम देण्यात आले होते. अतिशय वेगात परंतु आवश्यक ती सर्व माहिती त्यांनी उत्तमप्रकारे दिली. कबड्डी खेळातील त्यांच्या अफाट ज्ञानाची प्रचिती सर्वांना आली. नेहमीच कबड्डी खेळाच्या स्पर्धांमध्ये पंचकार्यात ते नेहमीच अग्रेसर असतात. 
          परिमंडळ क्र. ३ चे प्रमुख तसेच मुलुंड 'टी' व भांडुप 'एस' विभागाचे कनिष्ठ पर्यवेक्षक शिवदत्त कोठेकर यांनी सांगितले की, मी स्वतः महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचा आजीव सभासद आहे. आपले शिक्षक किती छान प्रकारे शिकवु शकतात हे आज आपणास बघायला मिळाले. वासुदेव बजागे यांना आपणास एक दिवस प्रो-कबड्डीत पंच म्हणून पाहायचे आहे. मला खात्री आहे की, नक्कीच ते तिथपर्यंत पर्यंत पोहोचतील. कबड्डी खेळासाठी त्यांचे मोठे योगदान आहे.

Post a Comment

Previous Post Next Post