चक्क.... पोलीस स्टेशनमध्येच दोन पोलिसांनी खेळला दांडिया

वणी: सध्या या ना त्या कारणाने चर्चेत असलेले वणी पोलीस ठाणे आता एका नवीन घटनेमुळे चांगलेच चर्चेत आले आहे. नाईटशिफ्टवर असलेले एक पोलीस अधिकारी व एका पोलीस कर्मचा-याची पोलीस ठाण्यातच चांगली जुंपल्याची खमंग चर्चा सध्या शहरात रंगत आहे. आधीच दुचाकी चोरी, शहरात सुरू असलेले घरफोडीचे सत्र इ गुन्ह्याचे धागेदोरे सापडले नसताना आता ठाण्यातील अंतर्गत वाद समोर आल्याने ठाण्याची अब्र वेशीवर टांगली गेली आहे.

गुरुवारी दिनांक 29 च्या रात्री 'नाईट शिफ्टचे कर्मचारी पोलीस ठाण्यात आले होते. दरम्यान रात्री 11 वाजताच्या सुमारास एक अधिकारी आणि ठाण्यातील एक कर्मचा-यांची यांच्यात काही कारणास्तव बाचाबाची झाली. अधिकारी म्हणजे 'राजे'च, त्यांचा पारा भडकला. ते कर्मचा-याच्या अंगावर 'टिपायला' गेले. मात्र त्यांचा भडकलेला पारा पाहून कर्मचा-याच्या देखील मनावरचा 'धीरज' सुटला, हा वाद वाढत फ्री स्टाईलपर्यंत पोहोचला, अशी खमंग चर्चा सध्या शहरात रंगत आहे. G

Post a Comment

Previous Post Next Post