मुलं चोरणारी टोळी समजून साधूंना बेदम केली मारहाण

पंढरपूर:- उत्तरप्रदेशमधील मथुरा येथील चौघे साधू हे कर्नाटकला देवदर्शनासाठी आले होते. त्यानंतर ते विजापूरवरुन जत तालुक्यातल्या लवंगामार्गे पंढरपूरला देवदर्शनासाठी निघाले होते. या साधूंनी गावातील एका मुलाला रस्ता विचारला. मात्र, त्या तरुणाला हे साधू मुलं चोरणारी टोळी असल्याचा संशय आला आणि त्याने ही माहिती गावकऱ्यांना दिली. याच संशयावरुन ग्रामस्थांनी साधूंना गाडीतून बाहेर काढून बेदम मारहाण केली. त्यांना लाठी-काठी आणि पट्टयाने जबर मारहाण करण्यात आली. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करत साधूंना जमावाच्या तावडीतून सोडवले. साधूंकडील अधारकार्ड आणि त्यांची संपूर्ण चौकशी केल्यानंतर ते खरचं कोणतीही मुलं चोरणारी टोळी नसून, देवदर्शनासाठी पंढरपूरला जात असल्याचं समोर आलं आहे.

Post a Comment

Previous Post Next Post