१६ वर्षीय नर्सवर केला डॉक्टरने बलात्कार....

नाशिक:- शहरामधून एक संताप जनक घटना समोर आली आहे एका खासगी रुग्णालयामध्ये काम करणाऱ्या सोळा वर्षीय प्रशिक्षणार्थी परिचारिकेवर तेथील डॉक्टरनेच बलात्कार केल्याची घटना सिडकोत उघडकीस आली. या प्रकरणी नाशिकच्या अंबड पोलीसात पीडितेच्या तक्रारीवरून पोस्को कायद्यांतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने नाशिक शहर हादरून गेले असून आरोपीचे नाव डॉ. उल्हास कुटे असे आहेत. अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोरवाडी येथे खाजगी रुग्णालयात ही संतापजनक घटना घडली आहे. त्यामुळे नाशिक शहरासह वैद्यकीय क्षेत्रात या घटणेचीच मोठी चर्चा आहे.

संशयित आरोपी डॉ. उल्हास कुटे यांनी पिडीतेच्या रूममध्ये प्रवेश करत असतांना माझे हात पाय दुखत असल्याने मी येतोय असे सांगून रूममध्ये प्रवेश केला. पीडित तरुणी या रुग्णालयात प्रशिक्षणार्थी परिचारिका आहे. प्रवेश केल्यानंतर डॉ. उल्हास कुटे याने पीडितेच्या शरीराला स्पर्श करत तिच्यावर बळजबरी करत शारीरिक अत्याचार केल्याचे पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हंटले आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित डॉ. उल्हास पांडुरंग कुटे ५०, रा. सिडकोहे रात्री 10.30 च्या सुमारास सिडको येथील त्यांच्या खासगी रुग्णालयामध्ये गेले असता, त्याच ठिकाणी राहणाऱ्या 16 वर्षीय प्रशिक्षणार्थी परिचारिकेका रूममध्ये एकटी असल्याची संधी साधत हातपाय दुखत असल्याच्या निमित्ताने तिच्या रूममध्ये प्रवेश करत तिच्यावर अत्याचार केला. तसेच झालेला प्रकार कुणाला सांगितल्यास पीडितेला कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली. या प्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून अंबड ठाण्यात संशयित आरोपी डॉ. उल्हास कुटे याच्याविरोधात पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. सहायक पोलिस आयुक्त सोहेल शेख व वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख, महिला पोलिस उपनिरीक्षक सोनल फडोळ अधिक तपास करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post