*चक्काजाम आंदोलन करण्यापूर्वीच आंदोलकांना झाली अटक* *आंदोलकांना अटक व सुटका* *मागण्या पूर्ण न झाल्यास गावकऱ्यांचा शासनाला आमरण उपोषणाचा इशारा*

आरमोरी: नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करण्यात यावा, शेतकयांना,शेतात जाण्यायेण्याकरीता वनविभागाने शेतकऱ्यांना सुरक्षा देण्यात यावी, रस्त्याच्या दोन्ही बाजूला आलेली झुडपे तोडण्यात यावे, प्रत्येक गावातील किमान ५ व्यक्तींना व्याघ्र संरक्षण दलात समाविष्ट करवात यावे,घरगुती विज बिलात ग्राहकावर लादलेला अतिरक्त इंधन समायोजन आकार रद्द करण्यात यावे, प्रत्येक गावात स्वतंत्र्य मुख्यालयी राहनारा लाईनमॅन देण्यात यावा, उपविभागीय विज अभियंता बोबडे यांना तात्काळ निलंबीत करण्यात यावे, वनविभागाने जंगलालगत असलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला एकरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी,पाथरगोटा गावाला स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा देण्यात यावा व स्मशानभूमिसाठी वनविभागाच्या वतीने जागा देण्यात यावी, रवि, मुलूरचक गावाला स्वतंत्र ग्रामपंचायत देण्यात यावी, कृषी पंपाचे प्रलंबीत विज कनेक्शन निकाली काढण्यात यावे, उपविभागीय विजअभियंता श्री बोबडे यांच्या कार्यकाळातील कामाची चौकशी करण्यात यावी,जोगीसाखरा येथे 33 के.वी.चे. विज पावर हाउस मंजूर करण्यात यावे, आदी विविध मागण्यांसाठी आरमोरी तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष संदीप ठाकूर, गडचिरोली जिल्हा रयत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष दिलीप घोडाम माजी पंचायत समिती सदस्य वृंदाताई गजभिये शहर अध्यक्ष सुनील नंदनवार, सदाशिव भांडेकर, ग्रा.प.सदस्या ज्योती घुटके यांच्या नेतृत्वात आज दि.२२ सप्टेंबरला आरमोरी येथील राष्ट्रीय मार्गावरील स्थानिक भगतसिंग चौकात शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत चक्काजाम आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.




 यासाठीआरमोरी तालुक्यातील जोगीसाखरा, पळसगाव, शंकरनगर, सालमारा कनेरी, पाथरगोटा, रामपुर, अंतरजी, कासवी, आष्टा व अन्य गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित झाले.
 चक्काजाम आंदोलन करण्यापूर्वी शेकडो आंदोलनकर्त्यांनी सर्वप्रथम अधिकाऱ्यांना बोलावून समस्या निराकरण करण्यासाठी सभा घेतली,शेकडो आंदोलनकर्त्यांनी आपल्या गावातील समस्यांचा अधिकाऱ्यासमोर पाढा वाचला. परंतु आंदोलन कर्त्याच्या प्रश्नांना योग्य उत्तर न मिळाल्याने ,आंदोलन कर्ते व अधिकाऱ्यात बाचाबाची झाल्याने खवळून जाऊन शेकडो नागरिकांनी अधिकाऱ्यासमक्ष राष्ट्रीय मार्गावर चक्काजाम करण्याचा पावित्रा घेतला,परंतु आरमोरी पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन व जनतेचे रुद्र रूप पाहून चक्काजाम करण्यापूर्वीच नेतृत्व करणाऱ्या आंदोलकांना अटक करून पोलीस ठाण्यात नेले.नेतृत्व करणाऱ्या प्रमुख आंदोलकांना पोलिसांनी अटक केल्याने शेकडो विविध गावातील नागरिकांनी पोलीस स्टेशन कडे आपला मोर्चा वळवून आंदोलनकर्त्यांना सोडण्याची मागणी केली. यावेळी आरमोरी पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या प्रमुख आंदोलकांना अटक करून सुटका केली.
 शासनाने येत्या आठ दिवसात नागरिकांच्या समस्यांचे निराकरण न केल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा १२ ही गावातील नागरिकांनी प्रशासनाला दिला आहे.आंदोलनस्थळी वडसा वनविभागाचे उपवनसंरक्षक धनंजय वायभासे,उपविभागीय पोलीस अधिकारी प्राणिल गिलडा, तहसीलदार कल्याणकुमार डहाट,वनपरिक्षेत्राधिकारी अविनाश मेश्राम, वीज वितरणचे वरिष्ठ अधिकारी डोंगरवार, अभियंता बोबडे,पोलीस निरीक्षक मनोज काळबांडे, व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
  यावेळी या आंदोलनात , आरमोरी तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष संदीप ठाकूर, गडचिरोली जिल्हा रयत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष दिलीप घोडाम पंचायत समिती मा.सदस्य वृंदा गजभिये सुनील नंदनवार, सदाशिव भांडेकर, ,ज्योती घुटके, शेषराव कुंमरे, नारायण सरकार, राजू आखरे ,नरहरी भजपुजे, प्रमोद धोटे, नितीन कहालकर,यादव काहलकर, सुनील कुंमरे ,चरणदास टेंभुर्णे ,विक्रम नारनवरे ,मनोहर मुळे ,देवराव वाकडे ,अरुण मानकर ,गजानन भोयर, अस्मित मानकर, साजन मानकर, गंगाधर कुंमरे ,चंद्रभान सहारे ,प्रेमिला मानकर ,सुरेश भोयर, प्रकाश मानकर ,अंकुश घोडमारे ,मंगल मंडल ,श्रीनिवास मंडल, सुबोध सरदार, उत्तम माझी, प्रमोद राय, कोकण सरदार, राजू मंडल, विजय मंडल, दिनेश माजी ,सुशांत मंडल, देवचंद दोनाडकर, हिवराज डोनाडकर, पंढरी दोनाडकर ,दादाजी बगमारे, प्रवीण कराणकर, अजय मेश्राम, सिद्धार्थ घुटके, देवेंद्र वाघमारे ,भगवान बुल्ले ,यशवंत खरकाटे ,सूर्यभान जुम्नाके, नितीन मडावी, रामदास सय्यम राजू मडावी ,जगदीश हजारे, महादेव राऊत, गोपाल बानवले ,भारत पिलारे ,लीलाधर धोटे, डाकराम दोनाडकर, दिलीप ठाकरे, विनेश पिल्लारे, प्रकाश भुते, यासहित जोगीसाखरा, पळसगाव,कासवी,आष्टा, अंतरजी,रामपूर,सालमारा, शंकर नगर, पाथरगोटा,रवी,मुल्लूर चक् येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.


Post a Comment

Previous Post Next Post