शारीरिक संबंध सुरु असताना चक्क कान चावून खाल्ला, तरुणीला अखेर बेड्या

सोशल मीडियावर सध्या एका आगळ्यावेगळ्या रोमान्सची जोरदार चर्चा सुरू असून थायलंडची राजधानी बँकोंग येथील पटाया येथे हा प्रकार उघडकीला आला आहे. थायलंडमध्ये फिरण्यासाठी गेलेल्या व्यक्तीने एका तरुणीसोबत एक रात्र घालण्याचा विचार केला होता त्यानंतर त्याने तिला काही रक्कम दिल्यानंतर दोघे सोबत असताना त्यांनी मद्य प्राशन केले आणि त्यानंतर शारीरिक संबंधा या दरम्यान तरुणीला उत्साह अनावर झाला आणि तिने या व्यक्तीचा कान तोडून चक्क चावून टाकला.


ज्या व्यक्तीचा कान चावण्यात आला त्याचे वय 55 वर्षे असून थायलंडमध्ये तो सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेलेला होता त्यावेळी त्याने एका ट्राफिक सिग्नलवरून एका तरुणीला आपल्या सोबत कारमध्ये घेतले आणि तिच्यासोबत एका हॉटेलमध्ये गेला. हा क्षण अविस्मरणीय राहील अशी त्याची आशा होती मात्र प्रत्यक्षात तरुणीने मध्ये प्राशन केल्यानंतर तिचा स्वतःवर ताबा राहिला नाही आणि तिने शारीरिक संबंधाया दरम्यान या व्यक्तीचा कानच तोडून टाकला.


कान तोडल्यानंतर हा व्यक्ती जोराजोराने ओरडु लागला मात्र तरीदेखील ती थांबत नव्हती आणि तिने तोडलेला कान चक्क चावून खाल्ला यानंतर पोलिसांना फोन करण्यात आला आणि या तरुणीला अटक करण्यात आली. तिचे नाव कनिका कंटू असे असल्याचे समजते. ती बऱ्याच वर्षापासून देहव्यापाऱ्याच्या व्यवसायात असून दारू पिल्यानंतर आपला आपल्यावर ताबा राहिला नाही आणि त्यातून आपल्याकडून हे कृत्य घडले असे तिने सांगितले आहे. ग्लोबल न्यूजने या संदर्भात वृत्त दिले आहे

Post a Comment

Previous Post Next Post