झोपेत असताना कुऱ्हाडीने वार करून वृद्धाची हत्या


सिंदेवाही : तालुक्यातील मेंढामाल येथे अज्ञात आरोपीने कुऱ्हाडीने वार करून एका वृद्धाची हत्या केली. ही घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली.

ईश्वर कवडू परचाके (६०) रा. मेंढामाल असे मृतकाचे नाव आहे. सिंदेवाही शहरापासून ३ किलोमीटर अंतरावरील मेंढामाल येथे बुधवारी रात्रीच्या वेळेस ईश्वर परचाके आपल्या घरी झोपले असताना अज्ञात आरोपीने कुऱ्हाडीने वार करून त्यांची हत्या केली. गुरुवारी सकाळी या घटनेची माहिती गावकऱ्यांना मिळताच पोलिसांना माहिती देण्यात आली. यात दोन संशयितांना पोलिसांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. सिंदेवाहीचे पोलीस निरीक्षक योगेश घारे पुढील तपास करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post