मोहझरी येथे बीएसएनएल थ्रीजी कव्हरेज वाढवा - नागरिकांची मागणी

मोहझरी:- आरमोरी तालुक्यातील मोहझरी या ठिकाणी 2 जी बीएसएनएलचा नेटवर्क आहे. परंतु तो नेटवर्क बिना कामाचा असल्यास मोबाईल खेळण्याची वस्तू बनली आहे.


म्हणजे विशेष म्हणजे मोहझरी पासून एक किलोमीटरवर अंतर असलेल्या सुकाळा येथे बीएसएनएलचा टॉवर आहे. तसेच मोहझरी पासून देलनवाडी पाच किलोमीटर अंतरावर सुद्धा बीएसएनएल टॉवर आहे. पण दोन्ही टॉवरचा थ्री जी नेटवर्क संबंधित टॉवर ठिकाणी देतात परंतु त्यानंतर दोन - चार किलोमीटर पर्यंत त्यांची रेंज कमी असल्यामुळे मोहझरी या ठिकाणी थ्री जी नेटवर्क पकडत नाही. तसेच साधा कवरेज सुध्दा पकडत नाही. त्यामुळे नागरिकांना ऑनलाइन व्यवहार करण्यास अडचण निर्माण होत आहे. BSNL च्या चुकीच्या धोरणामुळे नागरिक जिओची सिम सध्या वापरत आहेत. त्यामुळे बीएसएनएलचे ग्राहक कमी झाल्याचे परिसरात चित्र दिसत आहे.

जिओ कंपनी खाजगी असल्यामुळे त्या कंपनीचा नेटवर्क उत्तम असतो परंतु शासकीय कंपनी असलेली बीएसएनएलचा अवस्था खराब झाल्याची दिसून येत आहे. बरेच लोक बीएसएनएल सिम जिओ मध्ये पोर्टेबली करून जिओचा उत्पन्नात भर पाडत आहेत.

त्यामुळे ग्राहकांचा बीएसएनएल वरती विश्वास उडाला की काय अशी अवस्था निर्माण झाली आहे.
मोहझरी येथे बीएसएनएल थ्री जी नेटवर्क उपलब्ध नसल्यामुळे रिचार्ज मारूनही तो वाया जात असल्याचे चित्र दिसत आहे.

त्यामुळे वरील बाबीचा गंभीरपणे विचार करून मोहझरी येथे बीएसएनएल थ्रीजी कव्हरेज वाढवण्याची मागणी मोहझरी येथील नागरिकांनी टेलिफोन विभागाकडे केली आहे

Post a Comment

Previous Post Next Post