मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम घोषित

गडचिरोली,(जिमाका)दि.28:सचिव राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र, मुंबई यांचे दि.07 सप्टेंबर 2022 रोजीच्या आदेशान्वये माहे जानेवारी 2021 ते मे 2022 या कालावधीत मुदत संपलेल्या व जून 2022 ते सप्टेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या (सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या) सार्वत्रिक निवडणूकांसाठी संगणक प्रणालीद्वारे राबविण्याचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आलेला असून त्यामध्ये अहेरी तालुक्यातील ग्रामपंचायत आरेंदा व खांदला इत्यादी समाविष्ट आहेत आणि प्रत्यक्ष निवडणूकीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.



निवडणूकीचे टप्पे दिनांक व वेळ:- तहसिलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करण्याचा दिनांक 13 09. 2022 (मंगळवार). नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक व वेळ (मंडळ कार्यालय इमारत तहसिल कार्यालय, अहेरी)- दिनांक 21.09.2022 (बुधवार) ते दिनांक 27.09.2022 (मंगळवार) वेळ सकाळी 11.00 ते दु.3.00 वाजेपर्यंत (दिनांक 24.09.2022 चा शनिवार व दिनांक 25.09.2022 रविवार चा वगळून). नामनिर्देशनपत्रांची छाननी करण्याचा दिनांक व वेळ (मंडळ कार्यालय इमारत तहसिल कार्यालय, अहेरी)- दिनांक 28.09.2022 (बुधवार) वेळ सकाळी 11.00 वाजतापासून छाननी संपेपर्यत. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक व वेळ (मंडळ कार्यालय इमारत तहसिल कार्यालय, अहेरी)- दिनांक 30.09.2022 (शुक्रवार) वेळ दुपारी 3.00 वाजेपर्यंत. निवडणूक चिन्ह नेमून देणे तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक व वेळ-दिनांक 30.09.2022 (शुक्रवार), वेळ दुपारी 3.00 वाजेनंतर. मतदानाचा दिनांक- दिनांक 13.102022 (गुरुवार) सकाळी 7.30 वा. पासून ते दुपारी 3.00 वा.पर्यंत. मतमोजणी व निकाल घोषित करण्याचा दिनांक (मतमोजणीचे ठिकाण व वेळ मा. जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेनुसार निश्चित करण्यात येईल)- दिनांक 14.10.2022 (शुक्रवार).
अहेरी तालुक्यातील सार्वत्रिक निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात दिनांक 07.09.2022 चे पासून निवडणूकीचा निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागु राहील,असे तालुका निवडणूक अधिकारी,तथा तहसिलदार,अहेरी ओंकार शेखर ओतारी यांनी कळविले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post