ब्रह्मपुरी येथील सामूहिक आत्महत्या प्रकरणातील त्या तिघांची प्रकृती अद्याप गंभीरच


ब्रह्मपुरी : एकाच परिवारातील चौघांनी सामूहिक आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली होती. यात पत्नीचा मृत्यू, तर पतीसह दोन मुले गंभीर होती. रविवारीही पती व दोन मुलांची प्रकृती गंभीरच असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या प्रकरणातील रामकांत दामोधर ठाकरे यांनी दोन तरुण मुले व पत्नीसह तणनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. यातील पत्नी गीता ठाकरे यांचा मृत्यू झाला, तर दोन मुले

गडचिरोली सामान्य रुग्णालयात, तर वडील खासगी रुग्णालय ब्रह्मपुरी येथे दाखल आहेत. गडचिरोली येथे दाखल दोन्ही मुलांची प्रकृती अद्याप गंभीर असून, पती रमाकांत यांचीही प्रकृती अत्यवस्थ असल्याची माहिती वैद्यकीय सुत्रानी दिली.

गीता ठाकरे यांचा रविवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यांच्यावर रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, यावेळी पती व दोन मुले रुग्णालयात असल्याने इतर नातेवाईक व नागरिकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार पार पडले.

Post a Comment

Previous Post Next Post