तिरुपती बालाजी संस्थानाची संपत्ती, मालमता ८५ हजार ७०५ कोटींची, १४ हजार कोटींपेक्षा जास्त ठेवी, सोन्याचा साठा १४ हजार टन..


पाच राज्यांच्या बजेटपेक्षा जास्त तिरुपती बालाजी संस्थानाची संपत्ती, मालमता ८५ हजार ७०५ कोटींची, १४ हजार कोटींपेक्षा जास्त ठेवी, सोन्याचा साठा १४ हजार टनांपेक्षा जास्त
देवा-धर्माच्या नावाखाली विदेशी अल्पसंख्य ब्राम्हणांकडून बहुजनांच्या पैशांची लूट
तथागत बुद्धांच्या विहारांवर कब्जा करत त्या विहारांचे मंदिरात रूपांतर करणार्‍या विदेशी अल्पसंख्य ब्राम्हणांनी देवा-धर्माच्या नावाखाली बहुजनांची लूट चालवली आहे. आता देशातील सर्वात श्रीमंत असलेल्या पाच राज्यांच्या बजेटपेक्षा जास्त तिरुपती बालाजी संस्थानाची संपत्ती असून ती संपत्ती डोळे विस्फारणारी आहे. या देवस्थानची मालमता ८५ हजार ७०५ कोटींची, १४ हजार कोटींपेक्षा जास्त ठेवी, सोन्याचा साठा १४ हजार टनांपेक्षा जास्त असल्याचे समोर आले आहे. हा बहुजनांचा अमर्याद पैसा आयताचा ब्राम्हणांच्या घशात जात असल्याने त्यांची पोटं आणखी तुळतुळीत होताना दिसत आहेत.



तिरुमला तिरुपती देवस्थानने या जगातील सर्वात श्रीमंत मंदिर ट्रस्टने अखेर त्यांच्या एकूण मालमत्ता किती याबद्दल माहिती उघड केले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार मंदिराची संपत्ती ही मेघालय, मिझोरम, नागालँड आणि सिक्कीम या पाच राज्यांच्या एकत्रीत बजेटपेक्षा बालाजी मंदिराची संपत्ती ही जास्त असल्याचे समोर आले आहे. मंदिराच्या ट्रस्टकडून याबद्दलची माहिती देण्यात आली आहे.



तिरूमला तिरूपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष वाय.व्ही. सुब्बारेड्डी यांनी सांगितले की, मंदिर ट्रस्टच्या आज देशभरात एकूण ९६० ठिकाणी मालमत्ता आहेत तसेच या मालमत्ता ७ हजार १२३ एकरमध्ये पसरलेल्या आहेत तसेच त्यांची किंमत ८५ हजार ७०५ कोटी रुपये इतकी आहे. १९७४ ते २०१४ दरम्यान, वेगवेगळ्या सरकारांच्या अंतर्गत वेगवेगळ्या तिरूमला तिरूपती देवस्थान ट्रस्टने वेगवेगळ्या कारणांसाठी मंदिर ट्रस्टच्या ११३ मालमत्ता निकाली काढल्या होती. त्यांनी स्पष्ट केले की २०१४ पासून एकही मालमत्ता निकाली काढली गेली नाही.


सुब्बा रेड्डी म्हणाले की, राज्य सरकारच्या निर्देशानुसार, माझ्या अध्यक्षतेखालील मागील तिरूमला तिरूपती देवस्थान विश्‍वस्त मंडळाने दरवर्षी मालमत्तेवर श्‍वेतपत्रिका जारी करण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या वर्षी पहिली श्‍वेतपत्रिका प्रसिद्ध झाली होती. तर सर्व मालमत्तेचे तपशील आणि मूल्यांकन असलेली दुसरी श्‍वेतपत्रिका आता देवस्थानच्या वेबसाइटवर अपलोड करण्यात आली आहे. देवस्थानाच्या अनेक राष्ट्रीय बँकांकडे १४ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त मुदत ठेवी आहेत तर सोन्याचा साठा १४ टनांपेक्षा जास्त आहे.

Post a Comment

Previous Post Next Post