गुंडगिरी करू नका.... एक दिवस तुमचीही कोनीतरी वाट लावणार...?



कोल्हापूर : शहरातील यादवनगर येथे रेकॉर्डवरील गुंडाचा अज्ञातांनी दगडांनी ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना काल शनिवारी रात्री उशिरा घडली. चिन्या ऊर्फ संदीप अजित हळदकर असे हत्या करण्यात आलेल्या गुंडाचे नाव आहे. तो १५ दिवसांपूर्वी तुरुंगातून जामिनावर सुटला होता.

मिळालेल्या माहितीनुसार,संदीप हळदकर हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. १५ दिवसांपूर्वी तो तुरुंगातून जामिनावर सुटला होता. नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी त्याला स्थानबद्ध करण्याची कारवाई सुरू केली होती. दरम्यान शनिवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास चिन्या हळदकर आणि संशयित यांच्यात दौलतनगर परिसरात वादावादी झाली. ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले. या वादातून चौघांनी चिन्यावर जीवघेणा हल्ला केला व दगडाने ठेचून खून केला.

Post a Comment

Previous Post Next Post