तलाठी आणि मधस्थी व्यक्तीला झाली रंगेहाथ अटक


बीड — खरेदी केलेल्या प्लॉटची फेरफार नोंद 7/12 नोंद घेण्यासाठी मध्यस्थामार्फत
सात हजार रुपयांचीची लाच घेताना तलाठी व मध्यस्थास 26 सप्टेंबर रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अंबाजोगाईत रंगेहाथ पकडले.
अंबाजोगाईत तक्रारदाराने प्लॉट खरेदी केला. त्याची सातबारा व फेरफार नोंद घेण्यासाठी तलाठी कार्यालयात गेला असता अंबाजोगाई सज्जाचे तलाठी प्रफुल्ल सुहासराव आरबाड वय 30 वर्ष याने 23 सप्टेंबर रोजी दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. याप्रकरणी लाच लूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर लाच पडताळणीत सात हजार रुपये स्वीकारण्याची तडजोड झाली. पैसे स्वीकारण्याचे ठिकाण निश्चिती झाली. निश्चित ठिकाणी एसीबी पथकाने सापळा लावला.


अंबाजोगाईतील शितल बिअरबारच्या समोर तलाठी प्रफुल्ल आरबाड हा एजंट नजीरखान उमरद राजखान पठाण यास सोबत घेऊन आला. यावेळी नजीरखान पठाण या मध्यस्थाच्या हातात तक्रारदारास पैसे देण्यास सांगितले. पैसे देताच सापळा लावलेल्या एसीबी पथकातील अधिकाऱ्यांनी झडप घालून दोघांनाही रंगेहाथ पकडले. याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात तलाठी व खाजगी मध्यस्था विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. अमोल धस, अंमलदार भरत गारदे, अविनाश गवळी, संतोष राठोड, चालक गणेश म्हेत्रे यांनी केली

Post a Comment

Previous Post Next Post