विद्यार्थ्यांना मोफत पासपोर्ट फोटो चे वितरण गौतम पंचभाई यांचा उपक्रम.

जि.प. शाळा येथील विद्यार्थ्यांना केले पासपोर्ट फोटो चे वितरण.

राजेंद्र बागडे नागपूर विभागीय प्रतिनिधी (ता.23)
                                      
  जिल्हा परिषद कन्या शाळा जलालखेडा येथील वर्ग 1 ली ते वर्ग 4 च्या विद्यार्थ्याना पासपोर्ट फोटोचे वितरण गौतम पंचभाई यांच्या कडून करण्यात आले. गौतम पंचभाई यांचा फोटोग्राफी चा व्यवसाय असून शाळेतील विद्यार्थ्यांना शासकीय कामाकरीता पास पोर्ट आकाराच्या फोटोची आवश्यकता असते. शाळेतील विद्यार्थीना आपली मदत व्हावी त्यांना या उद्देशाने गौतम पांचभाई यांनी शाळेचे शाळेचे मुख्याधापक विजय भड यांच्याशी चर्चा केली व शाळेमध्ये पासपोर्ट कॅम्प घेऊन विद्यार्थ्यांचे फोटो काढले व शुक्रवारी शाळेतील विद्यार्थ्यंना ते पास पोर्ट आकाराचे फोटो वितरित करण्यात आले. एका विद्यार्थ्याला मोफत 12 पासपोर्ट साईज फोटो वाटप करण्यात आले.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक विजय भड, सहाय्यक शिक्षक निशा भक्ते, पत्रकार पवन कळंबे, गोपाल मोरे, योगेश चौरे, गौतम पंचभाई, प्रज्वल वाडबुदे, केशव सेवतकर, मीरा अंबोरे, शिक्षक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.

फोटो ओळी. विद्यार्थ्यांना पास पोर्ट आकाराचे फोटो वितरित करताना गौतम पंचभाई, पवन कळंबे, विजय भड, गोपाल मोरे.




बॉक्स,
           माझा फोटोग्राफीचा व्यवसाय आहे. या व्यवसायातून होणाऱ्या नफ्यातून मी पासपोर्ट वाटप कॅम्प जि.प. शाळा मध्ये घेतला तसेच गरजू विध्यार्थाना शालेय साहित्य उपलब्ध करून देण्याचा माझा उद्देश असून कोणताही विद्यार्थी शिक्षणा पासून वंचित राहू नये अशी माझी इच्छा आहे. यापूढे शुद्धा मी जलालखेडा सर्कल मध्ये शाळेत मोफत पासपोर्ट फोटो वाटप चा कॅम्प घेणार आहे.
             गौतम पंचभाई फोटो ग्राफर जलालखेडा

Post a Comment

Previous Post Next Post