भारतातून डिझेल मॅकनिक मध्ये प्रथम आला महाराष्ट्रातील देसाईगंज येथील सुशिल हेडावू.

नूतन शिक्षण प्रसारक मंडळच्या वतीने केला उपाध्यक्ष, व सचिवांनी केला सत्कार

देसाईगन्ज - औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय. टी. आय) यांनी घेतलेल्या वार्षिक परीक्षात महाराष्ट्रातील अतिशय दुर्गम अशा गडचिरोली जिल्ल्यातील देसाईगंज येथील युवक शुशिल हेडावू यांनी टॉप केले आहे.

ह्या ऑनलाईन परीक्षांचे आयोजन नॅशनल काउंसिल ऑफ वोकेशनल ट्रेनिंग (एनसीवीटी) यांनी केला होता.. राष्ट्रीय मेरीटमध्ये आलेला हा विद्यार्थी आदीवासी बहुल गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज येथील असून त्याचे विद्यालयीन शिक्षण मं गांधी
येथून झाले तर महाविद्यालयीन शिक्षण आदर्श कनिष्ठ
महाविद्यालयातून कामर्स या शाखेतुन् झालेले होते.बारावीनंतर देसाईगंज येथील ओधोगिक प्रकिशन संस्थेत डिझेल मेक्यानिक या ट्रेड मध्ये प्रवेश घेतला.नुकत्याच लागलेल्या निकालानुसार वडसा आय.टी. आय.मधील यांत्रिक डिझेल या व्यवसायातील प्रकिशनार्थी संपूर्ण देशातून सर्वच ट्रेडमधून हा विध्यार्थी 600 पैकी 594 गुण मिळवून प्रथम आलेला आहे. या गुनवन्त मुलांचे सत्कार संस्स्थेच्या वतीने उपाध्यक्ष जयदीश शर्मा, सचिव मोतीलाल कुकरेजा यांनी काल दि.12 ला शाल व श्रीफळ देऊन केले . हया गुणवंत युवकांचा दि. १७ सप्टेंबरण दिल्ली येथे होणा-या दिक्षांत समारोहात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हस्ते या मुलांचे सत्कार होणार आहे.

संपूर्ण भारतातून डिझेल मैकनिक या ट्रेडमधून प्रथम आल्याने औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य विकास आडे यांनीही कौतुक केलेअसून सर्वच सस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.संपूर्ण देशातून हा विध्यार्थी प्रथम आला आहे ही माहिती महाराष्ट्र तसेच महाराष्ट्र मंत्रालंय त्रिशालजीत शेठी,अतिरिक्त सचिव तसेच संचालक जनरल ट्रेनींग यांनी कळविले आहे .

Post a Comment

Previous Post Next Post