वनश्री महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस विविध कार्यक्रमांनी साजरा

कोरची:

स्थानिक वनश्री कला व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वत्तीने राष्ट्रीय सेवा योजना दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरवात महाविद्यालयातील आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता व योगा करुन करण्यात आली. त्यानंतर महाविद्यालयात प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. विनोद चहारे हे होते. तर विशेष अतिथी म्हणून प्रा. सी. एस. मांडवे व प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. एम. डब्लू. रुखमोडे उपस्थित राहून विद्यार्थांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन कु. धर्मिन भक्ता हिने केले तर प्रास्ताविक प्रा. सी. एस. मांडवे व उपस्थितांचे आभार कु. अंजली बोगा हिने मानले.






सदर कार्यक्रमाच्या यशस्विततेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे बहुसंख्य विद्यार्थी व रासेयो स्वयंसेवक उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेतला.









Post a Comment

Previous Post Next Post